Join us  

शोएब अख्तरला Live Show मधील भांडण महागात पडलं; चॅनेलनं ठोकला १० कोटींचा मानहानीचा दावा

शोएब अख्तरने चॅनेलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 6:04 PM

Open in App

कराची:पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच एका टीव्ही शोच्या लाइव्ह कार्यक्रमात झालेले भांडण आणि त्यानंतर तडकाफडकी शोएब अख्तरने दिलेला राजीनामा चांगलाच महागात पडणार आहे. कारण, या चॅनेलने शोएब अख्तरविरोधात १० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. शोएब अख्तरने चॅनेलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. 

कॉन्ट्रॅक्टच्या नियांमाप्रमाणे तीन महिन्याची नोटिस दिल्याशिवाय चॅनेल किंवा तिथे काम करणारा एकमेंकापासून वेगळे होऊ शकत नाहीत. अख्तरने २६ ऑक्टोबर रोजी लाइव्ह शोमध्ये राजीनामा दिला, ज्यामुळे पीटीव्ही चॅनेलचे मोठे नुकसान झाले आहे, असे या नोटिसीत म्हटल्याचे सांगितले जात आहे. 

हरभजन सिंगसोबत भारताच्या एका टीव्ही शोमध्ये दिसला

शोएब अख्तरने टी-२० विश्वचषकादरम्यान अचानाक दुबई सोडली. त्याने पीटीव्ही मॅनेजमेंटला कोणतीच माहिती दिली नाही. उलट हरभजन सिंगसोबत तो भारताच्या एका टीव्ही शोमध्ये दिसून आला. यामुळेही पीटीव्हीचे नुकसान झाले आहे, असे सांगत पीटीव्हीने शोएब अख्तरला १०० मिलियनची नोटीस बजावली आहे. 

दरम्यान, शोएब अख्तर हा पीटीव्हीच्या एका शोमध्ये चर्चेत सहभागी होता. पीटीव्हीचा ‘गेम ऑन है’ नामक शोमधील चर्चेदरम्यान अख्तरने पाकिस्तान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस राउफ यांचे कौतुक केले. पाकिस्तान सुपर लीगच्या लाहौर कलंदर्स संघातून हे दोघे समोर आले आहेत, असे अख्तर म्हणाला. त्यावेळी शोचा अँकर नियाज याने अख्तरला मध्येच तोडत शाहीन पाकिस्तानच्या अंडर-१९ टीममध्येही असल्याची आठवण करून दिली. यानंतर मी हारिस राउफपबद्दल बोलतोय, असे शोएब म्हणाला. पण अख्तरचा बोलतानाची पद्धत नियाजला न आवडल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी नियाजने अख्तरला चांगलेच सुनावले. तसेच असे ओव्हरस्मार्ट वागणार असाल, तर तुम्ही शोमधून जाऊ शकता असेही म्हणाला.  

टॅग्स :शोएब अख्तरट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तान
Open in App