अबुधाबी : पाकिस्तानने सलग चौथा विजय मिळवताना नामिबियाचा ४५ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक स्पर्धेत ग्रुप-२ मधून उपांत्य फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १८९ धावा केल्यानंतर पाकिस्तानने नामिबियाला २० षटकांत ५ बाद १४४ धावांत रोखले.
भल्यामोठ्या आव्हानाच्या ओझ्यापुढे नामिबिया पूर्णपणे दबले गेले. डेव्हिड विसे (३० चेंडूंत नाबाद ४३) व क्रेग विलियम्सन (३७ चेंडूंत ४०) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. हसन अली, इमाद वसिम, हॅरिस रौफ आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, मोहम्मद रिझवान व कर्णधार बाबर आझम यांच्या शतकी सलामीच्या जोरावर पाकिस्तानने धावांचा डोंगर उभारला. बाबरने ४९ चेंडूंत ७ चौकारांसह ७० धावा केल्या, तर रिझवानने ५० चेंडूंत नाबाद ७९ धावा काढत ८ चौकार व ४ षटकार मारले. पाकने प्रतिकूल परिस्थितीचा सराव करण्याच्या उद्देशाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नामिबियाने सुरुवातीची काही षटके टिच्चून मारा करत आपली क्षमता दाखवली.
धावफलक
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान नाबाद ७९; बाबर आझम झे. फ्रायलिंक गो. विसे ७०, फखर झमाँ झे. ग्रीन गो. फ्रायलिंक ५, मोहम्मद हाफीझ नाबाद ३२, अवांतर - ३. एकूण : २० षटकांत २ बाद १८९ धावा. बाद क्रम : १-११३, २-१२२. गोलंदाजी : रुबेन ट्रम्पेलमन ४-१-३६-०; डेव्हिड विसे ४-०-३०-१; जे. जे. स्मिथ ४-०-५०-०; जॅन फ्रायलिंक ४-०-३१-१; बेन शिंकोगो २-०-१९-०; जॅन निकोल लोफ्टी-इटॉन २-०-२०-०.
नामिबिया : स्टिफन बार्ड धावबाद (रौफ/रिझवान) २९, मायकल लिंगेन त्रि. गो. अली ४, क्रेग विलियम्सन झे. अली गो. शादाब ४०, गेरहार्ड इरास्मस झे. शादाब गो. वसिम १५, डेव्हिड विसे नाबाद ४३, जे. जे. स्मिथ झे. झमाँ गो. रौफ २, जॅन निकोल लॉफ्टी-इटॉन नाबाद ७. अवांतर - ४. एकूण : २० षटकांत ५ बाद १४४ धावा. बाद क्रम : १-८, २-५५, ३-८३, ४-९३, ५-११०. गोलंदाजी : शाहीन अफ्रिदी ४-०-३६-०; हसन अली ४-०-२२-१; इमाद वसिम ३-०-१३-१; हॅरिस रौफ ४-०-२५-१; शादाब खान ४-०-३५-१; मोहम्मद हाफीझ १-०-११-०.
Web Title: Pakistan in the semifinals; Namibia defeated by 45 runs; Rizwan and Babar hit hard pdc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.