इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) आज विराट कोहलीचा ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघ डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादचा ( SRH) सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. कोरोनावर मात करून RCBचा वॉरियर देवदत्त पडिक्कल आज मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे. विराटसाठी ही आनंदाची बातमी आली असताना पाकिस्तानी खेळाडूनं टीम इंडियाच्या कर्णधाराला मोठा धक्का दिला. पाकिस्तानाचा बाबर आजम ( Pakistan skipper Babar Azam) याची तुलना विराटशी नेहमीच केली जाते. पण, टीम इंडियाचा कर्णधार आकड्यांच्या बाबतीत पाकिस्तानी फलंदाजांच्या खूप पुढे आहे. असे असले तरी बाबर आजमनं बुधवारी विराटला मोठा धक्का दिला. 'पोलार्ड आऊट झाला का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या Live भाषणादरम्यान MI चाहत्यांची चर्चा!
पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर यानं आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ पासून अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या विराटला पाकिस्तानी फलंदाजासाठी ती जागा सोडावी लागली. विराट १२५८ दिवस वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. ( Most consecutive days as No.1 ODI batsman in ICC rankings). वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स ( १७४८ दिवस) आणि ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेवन ( १२५९) यांच्यानंतर विराट सर्वाधिक काळ वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान राहिला होता. पाय मुरगळला, तरीही रोहित शर्मानं सोडलं नाही मैदान; MIच्या कॅप्टननं कमावला मान!
इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकात विराटला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानं केवळ १२९ धावा केल्या होत्या. दुसरीकडे बाबर आजमनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत ७६च्या सरासरीनं तीन सामन्यांत २२८ धावा चोपल्या. या कामगिरीमुळे तो आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. बाबरच्या खात्यात सध्या ८६५ गुण आहेत आणि विराटकडे ८५७ गुण आहेत. त्यानंतर रोहित शर्मा ८२५ गुणांसत तिसऱ्या व रॉस टेलर ८०१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. हारी बाज़ी को जीतना हमे आता है!; अखेरच्या षटकांत गेम पलटला, MIनं गमावलेला सामना असा जिंकला!