कोरोना व्हायरस संकटाचा मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावावर प्रचंड टीका झाली. कोरोना व्हायरसच्या संकटात भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका झाली, तर दोन्ही देशांतील संबंध सुधारतील आणि जमा होणाऱ्या निधीचं दोन्ही देशांत समसमान वाटप केलं जाईल, असे पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाचे म्हणणे होते. पण, भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावस्कर यांनी अख्तरचा चांगलाच समाचार घेतला. आता अख्तरच्या मदतीसाठी पाकिस्तानचा आणखी एक माजी खेळाडू मैदानावर उतरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...
कोरोना व्हायरसच्या संकटात क्रीडाविश्वाकडूनही पाठिंब्याची गरज आहे. केवळ आर्थिक मदत करून नव्हे, तर या व्हायरसविषयी जनजागृती करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्या उद्देशानं 44 वर्षीय अख्तरनं भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. अख्तरच्या या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केली. त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलाच, शिवाय कपिल देव यांनी पाकिस्तानला दहशतवादी कृत्य करू नका असा दमही भरला. ( Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!)
पाकिस्तानचा दिग्गज फिरकी गोलंदाज साकलेन मुश्ताक यानं अख्तरच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला आहे. तो म्हणाला,''आपण खेळाडूंना काय म्हणतो? आपण त्यांना हिरो म्हणतो आणि गम त्यांचं कर्तव्य काय? चांगलं काम करणं हे त्यांचे काम आहे. हार-जीत हा खेळाचा भाग आहे. क्रिकेट हे काही युद्ध नव्हे. त्यामुळेच मला वाटतं की भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट व्हायला हवं.''
अश्विन भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सकलेन मुश्ताक
भारताविरुद्ध क्रिकेट मालिका होत नसल्यामुळे पाकिस्तानचं आर्थिक नुकसान होतंय, या विधानाचे मात्र मुश्ताकनं खंडन केलं. तो म्हणाला,''भारताविरुद्ध न खेळण्यानं पाकिस्तानचं नुकसान होतंय, या मताशी मी सहमत नाही. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका झाल्यास, देशांतील संबंध सुधारतील.''