Join us  

PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर

pak vs eng 1st test match : पाकिस्तान आगामी काळात आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 9:14 AM

Open in App

PAK vs ENG Test Series : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. सात ऑक्टोबरपासून पाकिस्तान आपल्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान मुल्तान येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. आयसीसीची मोठी स्पर्धा पाकिस्तानात होणार असल्याने पीसीबीने स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या आधी देखील पीसीबीने स्टेडियमच्या दुरुस्तीचे कारण सांगून कराची येथे सामने खेळवले नव्हते. त्यामुळे कराची येथे एकही सामना होणार नाही. पुन्हा एकदा शेजाऱ्यांचा संघ शान मसूदच्या नेतृत्वात असेल.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आपल्या मायदेशात बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. दोन सामन्यांच्या या मालिकेत बांगलादेशने २-० असा ऐतिहासिक विजय मिळवला. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तान आपल्या घरात कसोटी सामना जिंकण्याच्या प्रतीक्षेत आहे. पाकिस्तानला मागील जवळपास तीन वर्षांपासून आपल्या घरात एकही विजय मिळवता आला नाही. शान मसूदला कर्णधारपद सोपवल्यानंतर पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया दौरा केला आणि तिथेही त्यांना जबर मार खावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे WTC च्या शर्यतीत कायम राहणे शेजाऱ्यांना कठीण झाले आहे. वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी सर्वच फॉरमॅटमध्ये पाकिस्तानची 'कसोटी' पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानात विजय मिळवणार का हे पाहण्याजोगे असेल. 

PAK vs ENG मालिकेचे वेळापत्रक ७-११ ऑक्टोबर, मुल्तान१५-१९ ऑक्टोबर, मुल्तान२४-२८ ऑक्टोबर, रावळपिंडी

पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ -शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमिर जमाल, अब्दुला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमझा, मोहम्मद हुरैय्या, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैय अयुब, सलमान अली अघा, सर्फराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी.

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड