नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. सध्या या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. खरं तर पहिल्या सामन्यात किवी संघ यजमानांना धूळ चारेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रकाशाचे कारण देत पाकिस्तानने पहिला सामना अनिर्णित करण्यात यश मिळवले. आता यजमान संघ वन डे मालिकेत किवी संघाशी दोन हात करणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी संघ मायदेशात किवी संघाविरूद्ध 3 सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. 9 ते 13 जानेवारी या दरम्यान ही मालिका पार पडेल.
अलीकडेच पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याने आज वन डे मालिकेसाठी संघ जाहीर झाल्यावर पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाकिस्तानी संघाचा प्लॅन सांगताना त्याने सरफराज अहमदकडे दुर्लक्ष होणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, मोहम्मद रिझवान संघाचा प्रमुख खेळाडू असून त्याला पर्याय म्हणून सरफराजकडे आम्ही पाहतो असेही आफ्रिदीने म्हटले. तसेच पाकिस्तानातील खेळपट्टीवर अधिक काम करण्याचा आमचा मानस असल्याचेही त्याने सांगितले.
पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका -
- पहिला सामना - 9 जानेवारी
- दुसरा सामना - 11 जानेवारी
- तिसरा सामना - 13 जानेवारी
न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, हारिस रौफ, हारिस सोहेल, इमाम उल हक, कामरान घुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सलमान अली अघा, शाहनवाज दहानी, शान मसूद, तय्याब ताहिर, उसामा मीर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Pakistan squad for the three-match ODI home series against New Zealand, now here full schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.