PSL 2020 विजेत्या कराची किंग्सला मिळाले ३.७५ कोटी; IPL 2020 विजेत्या MIच्या तुलनेत ही रक्कम म्हणजे...  

प्रथम फलंदाजी करताना कलंदर्सकडून तमिम इक्बाल ( ३५), फाखर जमान ( २७) या सलामीवीरानंतर अन्य फलंदाजांची गाडी घसरली. त्यामुळे त्यांना ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले. कराची किंग्सनं बाबर आझमच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर पाच विकेट्स राखून जेतेपद पटकावं

By स्वदेश घाणेकर | Published: November 18, 2020 11:31 AM2020-11-18T11:31:43+5:302020-11-18T11:32:08+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan Super League 2020 to carry total prize money of 7.5 crore; comparing to IPL 2020 Prize Money is to less | PSL 2020 विजेत्या कराची किंग्सला मिळाले ३.७५ कोटी; IPL 2020 विजेत्या MIच्या तुलनेत ही रक्कम म्हणजे...  

PSL 2020 विजेत्या कराची किंग्सला मिळाले ३.७५ कोटी; IPL 2020 विजेत्या MIच्या तुलनेत ही रक्कम म्हणजे...  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान सुपर लीगला ( Pakistan Super League 2020) मंगळवारी नवा विजेता मिळाला. लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात Karachi Kingsने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कलंदर्सला ७ बाद १३४ धावाच करता आल्या आणि किंग्सनं हे लक्ष्य १८.४ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार करून पहिल्यांदा PSLचे जेतेपद नावावर केले. पहिल्यावहिल्या जेतेपदानंतर कराची किंग्सला बक्षीस रक्कम म्हणून ३.७५ कोटी देण्यात आले. आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला मिळालेल्या बक्षीस रकमेच्या तुलनेत ही रक्कम किती कमी आहे हे आकडा पाहूनच कळेल.

प्रथम फलंदाजी करताना कलंदर्सकडून तमिम इक्बाल ( ३५), फाखर जमान ( २७) या सलामीवीरानंतर अन्य फलंदाजांची गाडी घसरली. त्यामुळे त्यांना ७ बाद १३४ धावांवर समाधान मानावे लागले. कराची किंग्सनं बाबर आझमच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर पाच विकेट्स राखून जेतेपद पटकावं. बाबरनं ४९ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं नाबाद खेळी केली. पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या मोसमात एकूण १ मिलियन म्हणजेच ७.५ कोटी ( भारतीय चलन) रुपये बक्षीस म्हणून वाटले गेले. त्यापैकी विजेत्या संघाला ३.७२ कोटी, तर उपविजेत्याला १.५ कोटी दिले. याशिवाय ३.३५ लाख रुपयांचे ३४ खेळाडूंमध्ये समान वाटप केले जाईल. सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज आदी पुरस्कारांसाठी एकूण ६० लाख रुपये दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम सर्वोत्तम कॅच, बेस्ट रन आऊट व सर्वाधिक षटकार आदी पुरस्कारांसाठी असेल. आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये किती बक्षीस रक्कम दिली जाते माहित्येय?

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे जेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये जेतेपद पटकावले होते. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांत ३० धावा देत ३ विकेट्स घेताना DCला २० षटकांत ७ बाद १५६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकाच्या जोरावर MIनं सहज बाजी मारली. बीसीसीआयनं मागील वर्षी बक्षीस रक्कम म्हणून ३२.५ कोटी खर्च केले होते. त्यानुसार विजेत्या संघाला २० व उपविजेत्याला १२.५ कोटी दिले होते. तेवढीच रक्कम बीसीसीआयनं यंदा दिली.  


मुंबई इंडियन्स ( विजेता) - २० कोटी, दिल्ली कॅपिटल्स ( उपविजेता) - १२.५ कोटी, सनरायझर्स हैदराबाद ( प्ले ऑफ) - ८.७८ कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( प्ले ऑफ) - ८.७८ कोटी अशी बक्षीस रक्कम यंदाही देण्यात आली. 

Web Title: Pakistan Super League 2020 to carry total prize money of 7.5 crore; comparing to IPL 2020 Prize Money is to less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.