Pakistan Super League 2024 : पाकिस्तान सुपर लीग २०२४ मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या लीग च्या १६ व्या सामन्यापूर्वी कराची किंग्ज संघाचे १३ खेळाडू अचानक आजारी पडले आहेत. गुरुवारी म्हणजेच २९ फेब्रुवारीला क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाबरोबर कराची किंग्सची लढत रंगली. पीएसएलमध्ये कराची किंग्ज संघाचा सामना क्वेटा ग्लॅडिएटर्ससोबत झाला होता. क्वेटाच्या खेळाडूंनी हा सामना ५ विकेट्सने जिंकला. या लीगनंतर कराची किंग्ज संघाचे एक नाही, २ नाही तर तब्बल १३ खेळाडू आजारी पडले. या संघातील प्रत्येक खेळाडूने पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली.
कराची टीममधील खेळाडू शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद नवाज , किरॉन पोलार्ड, शान मसुद या खेळाडूंच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. लीगच्या या सीझनमध्ये, कराची किंग्जला गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी त्यांचा ५वा सामना खेळवला गेला. पण यापुढील सामन्यांसाठी संघातील खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसतील तर कराची किंग्ज संघासमोर मोठी समस्या असेल. कराचीचे पीएसएल २०२४ मध्ये पदार्पण देखील आतापर्यंत काही खास राहिलेले नाही, त्यामुळे या संघाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पाकिस्तान मीडिया रिपोर्टनूसार, कराची संघातील या १३ खेळाडूंना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. अशी तक्रार या खेळाडूंनी केली आहे.
पाकिस्तान सुपर लीग २०२४ मध्ये कराची किंग्जची अवस्था अत्यंत वाईट आहे. गुणतालिकेत संघ चौथ्या स्थानावर आहे. लीगच्या या मोसमात, संघाने एकूण ४ सामने खेळले आहेत ज्यात दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. त्यामुळे आता आपल्या संघाचे खेळाडू आजारी पडणे हा कराचीसाठी मोठा धक्का आहे.