मुंबई : सध्याच्या घडीला पाकिस्तानी संघातील हिंदू क्रिकेटपटूंना नमाज पडण्यावर सक्ती असल्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. पण पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडू शकतो, तर भारताचा माडी कर्णधार महेंद्रसिं धोनी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर का वापरू शकत नाही, असा सवाल आता नेटकऱ्यांनी विचारला आहे.
धोनीने काही महिन्यांपूर्वी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर लावला होता. धोनी हा भारतीय आर्मीचा एक सदस्य आहे. त्याला मानद पदही देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधील विश्वचषकानंतर तो आर्मीबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये सराव करण्यासही गेला होता.
जेव्हा धोनीने आपल्या ग्लोव्हजवर लोगो लागल्याचे वायरल झाले, तेव्हा त्याला हा लोगो काढण्यास सांगितले गेले. धोनीनेही हा लोगो आपल्या ग्लोव्हजमधून काढला होता. पण जर पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडत असेल, तर धोनीने लोगो वापरण्यात गैर काय आहे, असा सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत.
पाकिस्तानी संघातील हिंदू क्रिकेटपटूंना नमाज पडण्यावर होती सक्ती; मोठा खुलासा
पाकिस्तानध्ये हिंदूंवर अन्याय केला जातो, हे आपण सारे ऐकून होतो. पण आता तर एक मोठा खुलासा समोर आला आहे. पाकिस्तानी संघातील हिंदू क्रिकेटपटूंना नमाज पडण्यावर सक्ती केली जायची, ही बाब आता पुढे आली आहे.
सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा एक फोटो चांगलाच वायरल होतो आहे. हा फोटो इंझमाम उल हक कर्णधार असतानाचा फोटो आहे. या फोटोमध्ये संघातील मुस्लीम वगळता अन्य धर्मांतील खेळाडूंना नमाज पडण्यावर सक्ती केली असल्याचे दाखवण्यात येत आहे.
इंझमाम कर्णधार असताना पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हा हिंदू खेळाडू होता, त्याचबरोबर युसूफ योहाना हा इसाई होता. पण तरीही या दोघांना संघा-बरोबर नमाज पडण्याची सक्ती केली जायची. कारण संघाबरोबर हे खेळाडूही नमाज पडताना दिसत आहेत. जर त्यांच्यावर सक्ती केली गेली नसती तर त्यांनी नमाज पडला नसता, असे चाहते म्हणत आहेत.
'हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच केला जातो, आम्ही तर अझरला कर्णधारही बनवले होते'
हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच केला जातो. भारतामध्ये मुस्लीमांना समान वाणूक मिळते, असे मत भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.
गंभीर म्हणाला की, " सध्याच्या घडीला इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. ते स्वत: पाकिस्तानचे कर्णधार होते. पण त्यांच्या राज्यतच जर असे होत असेल तर ते निंदनीय आहे. भारतामध्ये असा भेदभाव केला जात नाही. भारतामध्ये असा भेदभाव केला जात असता तर मोहम्मद अझरूद्दिन कर्णधार झाला नसता."
Web Title: 'Pakistan team can offer prayers in the field, why not use Dhoni Army logo on gloves'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.