Shadab Khan: शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण

Shadab Khan Wedding: अलीकडेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंनी लग्न केले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 10:35 AM2023-01-24T10:35:23+5:302023-01-24T10:36:06+5:30

whatsapp join usJoin us
 Pakistan team player Shadab Khan is married to Saqlain Mushtaq daughter | Shadab Khan: शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण

Shadab Khan: शादाब खानने दिग्गज पाक क्रिकेटरच्या लेकीशी गुपचूप उरकलं लग्न; नंतर सांगितलं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shadab Khan Wife Photo | नवी दिल्ली : अलीकडेच पाकिस्तानी संघातील काही खेळाडूंनी लग्न केले आहे. डिसेंबर महिन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ विवाहबंधनात अडकला. याशिवाय पाकिस्तानी संघाचा स्टार फलंदाज शान मसूदने 20 जानेवारीला नव्या आयुष्याला सुरूवात केली. एकीकडे लोकेश राहुल आणि अथिया शेट्टीने सातफेरे घेतले. तर तिकडे पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानने देखील लग्न केले आहे.

पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने ट्विटच्या माध्यमातून आपल्या लग्नाची माहिती दिली. त्याने ट्विट करत लिहले, "अलहमदुलिल्लाह आज माझे लग्न होते, तो माझ्या आयुष्यातील एक मोठा दिवस होता आणि आज एक नवीन अध्याय जोडला गेला आहे, कृपया माझ्या निवडीचा आणि माझ्या पत्नीचा तसेच आमच्या कुटुंबाचा आदर करा. तुम्हा सर्वांना आशीर्वाद आणि खूप सारे प्रेम."

याशिवाय शादाब खानने आपल्या चाहत्यांसाठी एक मेसेज लिहला आहे. "मी माझे मार्गदर्शक साकी भाईच्या (सकलेन मुश्ताक) कुटुंबाचा एक भाग बनत आहे. जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून मला माझे वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवायचे होते, माझ्या कुटुंबालाही हीच बाब आवडली. याशिवाय माझ्या पत्नीनेही हीच इच्छा व्यक्त केली. तिचे आयुष्य खासगी असावे असे तिला वाटते. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या पत्नीच्या आणि आमच्या कुटुंबाच्या निवडीचा आदर करा. तरीही तुम्हाला शुभेच्छा पाठवायच्या असतील तर मी बँक खाते क्रमांक पाठवीन." 

दरम्यान, शादाब खानचे लग्न पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्या मुलीशी झाले आहे. शादाबच्या लग्नासंबंधीचा एक व्हिडीओही ट्विटरवर व्हायरल झाला आहे, मात्र त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. खरं तर हारिस रौफचे लग्न झाले तेव्हाच शादाबने एक ट्विट करून आपल्या लग्नाचे संकेत दिले होते. हारिस रौफचा फोटो शेअर करत त्याने लिहिले होते,"एवढा आनंद हारिस रौफ, वाटतं आता माझाही नंबर येईल."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title:  Pakistan team player Shadab Khan is married to Saqlain Mushtaq daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.