पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर अबिद अली ( Abid Ali) याला Quaid-e-Azam Trophy स्पर्धेतील सामना सुरू असताना अचानक छातीत दुखू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. या स्पर्धेत सेंट्रल पंजाब संघाकडून अली खेळतो आणि केपी संघाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
२००५मध्ये अबीद अलीनं लिस्ट ए आणि २००७ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मार्च २०१९ मध्ये त्याला पाकिस्तानच्य सीनियर संघा तखेळण्याची संधी मिळाली. त्यानं १०० प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६७०० धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३००० धावा आहेत. वन डे व कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या वन डे सामन्यात त्यानं ११२ धावा केल्या आणि पाकिस्तानकडून वन डे पदार्पणातील ही एखाद्या फलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपसाठीच्या संभाव्य संघातही त्याची निवड झाली, परंतु त्याला अंतिम संघात स्थान पटकावता आले नाही. ऑक्टोबर २०१९मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं आणि शतक झळकावलं. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्यानं १७४ धावांची खेळी केली. पहिल्या दोन कसोटीत शतक झळकावणारा तो पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला.