यंदाचे वर्ष पाकिस्तानी संघानं गाजवलंय... ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्ताननं या वर्षात २९ पैकी २० सामने जिंकले आणि कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पाकिस्ताननं नावावर केला. पाकिस्तानच्या या यशात मोहम्मद रिझवान व बाबर आजम या दोन खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. या दोघांनी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०२१ मध्ये अनेक विक्रम तोडले. रिझवान तर ट्वेंटी-२०तील सुपरस्टार झाला आहे.
मोहम्मद रिझवान कँलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
मोहम्मदनं २०२१ या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २०३६ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२०त कॅलेंडर वर्षात २०००+ धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्यानंतर बाबरचा क्रमांक येतो त्यानंही या वर्षात १७६९ धावा केल्या आहेत. ख्रिस गेलनं २०१५मध्ये १६६५ धावा केल्या होत्या, तर विराटनं २०१६मध्ये १६१४ धावा केल्या. ट्वेंटी-२०त सर्वाधिक शतकी भागीदारीच्या विक्रमात रिझवान-बाबर जोडीनं ( ६ शतकी भागीदारी) रोहित शर्मा व लोकेश राहुल यांचा ५ शतकी भागीदारीचा विक्रम मोडला.
२०२१ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत बाबर १७७९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ६०.६०च्या सरासरीनं ३०३ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पणातच सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बाबरनं नावावर केला आहे. वन डे क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे आणि ट्वेंटी-२०तही तो हे स्थान पटकावू शकतो.
रिझवान व आजम यांच्या खेळाचे पाकिस्तानचा माजी खेळाडू राशिद लतिफ यानं कौतुक केलं. PTV Sports ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,''बरोबर वर्षभरापूर्वी पाकिस्तानकडे विराट कोहली, रोहित शर्मा किंवा लोकेश राहुल यांच्यासारखे ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडू नाहीत, असं आपण म्हणायचो. पण, आता काळ बदलला आणि काही दिवसांनी भारतीयांना त्यांच्याकडे रिझवान व बाबर यांच्यासारखे खेळाडू नसल्याची खंत वाटेल.''
Web Title: Pakistan used to say we don’t have Kohli and Rohit, now India will say we don’t have Babar and Rizwan: Rashid Latif
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.