Michael Kasprowicz In Panic Mode, Pakistan vs Australia 3rd Test: पाकिस्तानात चाललंय काय... आता सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरला मागावी लागली माफी; कारण वाचून धक्काच बसेल!

पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या विचित्र गोष्टी घडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:25 PM2022-03-23T13:25:42+5:302022-03-23T13:26:02+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan vs Australia 3rd Test Live Updates Video Australian commentator Michael Kasprowicz In panic Mode tenders apology After Calling Pitches flat Despite Warning | Michael Kasprowicz In Panic Mode, Pakistan vs Australia 3rd Test: पाकिस्तानात चाललंय काय... आता सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरला मागावी लागली माफी; कारण वाचून धक्काच बसेल!

Michael Kasprowicz In Panic Mode, Pakistan vs Australia 3rd Test: पाकिस्तानात चाललंय काय... आता सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरला मागावी लागली माफी; कारण वाचून धक्काच बसेल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Michael Kasprowicz In Panic Mode, Pakistan vs Australia 3rd Test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये कसोटी सामना सुरू आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन दिवसांत ऑस्ट्रेलियाने सुमारे ४०० धावांचा टप्पा गाठला तर पाकिस्ताननेही दमदार सुरुवात केली. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही धावांचा पाऊस पडताना दिसतोय. या मालिकेतील खेळपट्टीबाबत बराच वाद झाला होता, मात्र आता तो वेगळ्या पातळीवर पोहोचला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी समालोचकांना खेळपट्टीबाबत बोलू नका, असे आवाहन केले.

लाहोर कसोटीदरम्यान माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकल कॅसप्रोविझने खेळपट्टीचे वर्णन करताना सपाट खेळपट्टी (Flat Pitch) असं केलं होतं. पण लगेच त्याने शब्द बदलत त्याऐवजी 'फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी' असा शब्दप्रयोग करावा लागला. मायकल कॅसप्रोविझचे हे विधान सध्या जोरदार व्हायरल होत असून चांगलंच चर्चेत आहे.

नक्की काय म्हणाला कॅसप्रोविझ...

समालोचन करताना माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर कॅसप्रोविझ म्हणाला, 'हे आवश्यक आहे.. आम्ही फिरकीपटू आणि त्यांच्या विविधतेबद्दल बोलतो. पण वेग ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण मिचेल स्टार्कबद्दल बोललो तर त्याचा वेग नेहमीच १४०च्या आसपास असतो. पण या सपाट खेळपट्ट्यांवर... माफ करा... अशा फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्ट्यांवर.. असं आपण म्हणूया"

दरम्यान लाहोर कसोटीआधी रावळपिंडी, कराची या दोन्ही कसोटीच्या खेळपट्टीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दोन्ही सामन्यात धावांचा पाऊस पडला. गोलंदाजांना विकेट्स मिळवण्यासाठी अक्षरश: घाम गाळावा लागला. पण या दरम्यान, पाक बोर्डाचे चेअरमन रमीझ राजा यांनी मात्र, समालोचकांनी खेळपट्टीवर चर्चा करू नये, असं आवाहन केल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं. त्यामुळे कॅसप्रोविझला त्याच्या वाक्यात लगेच दुरूस्ती करावी लागली.

Web Title: Pakistan vs Australia 3rd Test Live Updates Video Australian commentator Michael Kasprowicz In panic Mode tenders apology After Calling Pitches flat Despite Warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.