Join us  

PAK vs ENG: "गोलंदाजांसाठी कबरस्तान"... पाकची बॅटिंग बघून पीटरसनची 'सटकली'

नाचता येईना अंगण वाकडे, असा खेळ सुरु झाला या आशयाच्या प्रतिक्रिया केविन पीटरसन आणि मायकल वॉन यांच्या ट्विटवर पाहायला मिळत आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 5:53 PM

Open in App

 Pakistan vs England, 1st Test : इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून मुल्तान कसोटी सामन्याने या मालिकेची सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तान कर्णधाराने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंंग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघाची सलामी जोडी लवकर फुटली. पण त्यानंतर  शान  मसूद (Shan Masood) आणि सलामीवीर अब्दुल्लाह शफिक (Abdullah Shafique) या दोघांनी शतकी खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांचे खाते पाडले.  

खेळपट्टीवरून पीटरसनचा पाकसा टोला 

पाकिस्तानच्या फलंदाजीत एकदम 'जान' आल्याचे पाहून इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसन आवाक् झाला आहे. मुल्तानच्या मैदानात इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेटसाठी सुरु असलेला संघर्ष पाहून हा दिग्गज पुन्हा खेळपट्टीच्या मुद्यावर आलाय. मुल्तानची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अजिबात अनुकूल नाही, हे सांगताना त्याने खेळपट्टी 'गोलंदाजांसाठी कबरस्तान' आहे, असे म्हटले आहे. त्याचे ट्विट सोशल मीडियाव चर्चेचा विषय ठरताना दिसते.  

नाचता येईना अंगण वाकडं!

केविन पीटरसन याच्याशिवाय मायकल वॉन यानेही मुल्तान खेळपट्टीवर आपलं मत व्यक्त केले आहे. मुल्तानची खेळपट्टी एखाद्या रस्त्यासारखी वाटते. इथं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणं शानदार आहे. मसूदची शतकी खेळी बघून मजा आली, असे तो म्हणाला आहे. इंग्लंडच्या दिग्गजाने पहिल्याच दिवशी खेळपट्टीवरून भाष्य केल्यावर पाकिस्तानी चाहते त्यांना ट्रोल करतानाही दिसत आहे. नाचता येईना अंगण वाकडे, असा खेळ सुरु झाला या आशयाच्या प्रतिक्रिया केविन पीटरसन आणि मायकल वॉन यांच्या ट्विटवर पाहायला मिळत आहे.  

पाकच्या ताफ्यातील दोघांच्या शतकी खेळीमुळं इंग्लंड बॅकफूटवर पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर कॅप्टन शान  मसूद (Shan Masood)  याने सलामीवीर अब्दुल्लाह शफिक (Abdullah Shafique) सह पाकच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची भागीदारी रचली. शफिक १८४ चेंडूत १०२ धावा करून तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत  १० चौकारांसह २ षटकारही मारले. त्याच्याशिवाय कॅप्टन मसूद याने १७७ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १५१ धावा केल्या.  

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा