Babar Azam नं दिली नव्हती किंमत; आता त्याचीच जागा घेत Kamran Ghulam नं दाखवली हिंमत

बाबरच्या जागी कामरान गुलाम याला पदार्पणाची संधी देण्यात आली. या खेळाडूनं संधीच सोनही करून दाखवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 02:54 PM2024-10-15T14:54:46+5:302024-10-15T14:55:31+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan vs England, 2nd Test once babar azam injustice him now debut star kamran ghulam replaced him in test against england know about Pakistan Team New Star | Babar Azam नं दिली नव्हती किंमत; आता त्याचीच जागा घेत Kamran Ghulam नं दाखवली हिंमत

Babar Azam नं दिली नव्हती किंमत; आता त्याचीच जागा घेत Kamran Ghulam नं दाखवली हिंमत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुल्तानच्या मैदानात रंगला आहे. गेल्या अनेक सामन्यात एका एका धावेसाठी संघर्ष करणारा स्टार खेळाडू बाबर आझम याला संघाबाहेर ठेवत पाकस्तानी संघ मैदानात उतरला. या सामन्यात शान मसूद यानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. बाबरच्या जागी कामरान गुलाम याला पदार्पणाची संधी देण्यात आली. या खेळाडूनं संधीच सोनही करून दाखवलं. पहिल्या दोन विकेट्स गमावलेल्या संघाचा डाव सावरत त्याने अर्धशतक झळकावून संघाचा डाव सावरला. बाबर आझमनं आपल्या कॅप्टन्सीत ज्या खेळाडूला कवडीची किंमत दिली नाही त्या गड्यानं बाबरची जागा घेत अगदी  झोकात पदार्पण केल्याचे पाहायला मिळत आहे.  बाबरनं आपल्या कॅप्टन्सीच्या काळात त्याच्यावर जो अन्याय केला होता त्याचा बदलाच त्यानं घेतलाय, असा हा सीन आहे.

बाबर आजमनं दिली नव्हती किंमत
 
कामरान गुलाम याला २०२३ मध्ये वनडे मालिकेसाठी पाकिस्तानी संघात स्थान मिळाले होते. पण बाबरनं त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही संधी दिली नव्हती. बदली खेळाडूच्या रुपात फक्त क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात दिसला होता. पण आता इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत संधी मिळताच त्याने आपले तेवर दाखवले आहेत. बाबर आझम याने या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

आता त्यानं बाबरच्या जागेवरच नव्या हिरोच्या रुपात मारलीये एन्ट्री

 यामागचं कारण पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने एका हंगामात हजार धावा करुन लक्षवेधून घेतले होते. पण बाबर आझमनं त्याला काही किंमत दिली नव्हती. पण आता वेळ बदललीये. ज्या बाबरनं त्याला किंमत दिली नाही त्याने हिंमत दाखवून देत धमाक्यात पदार्पण केले आहे. तेही बाबर आझमच्या जागेवर. 

प्रथम श्रेणीत फर्स्टक्लास कामगिरी

कामरान गुलाम याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी उत्तम आहे. ५९ सामन्यात त्याने ४९.१७ च्या सरासरीनं ४,३७७ धावा केल्या आहते. यात १६ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. बॅटिंगशिवाय हा गडी डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करून फलंदाजांची फिरकी घेण्याची क्षमताही बाळगून आहे.  

 

 

Web Title: Pakistan vs England, 2nd Test once babar azam injustice him now debut star kamran ghulam replaced him in test against england know about Pakistan Team New Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.