Join us  

पाकिस्तान वि. न्यूझीलंड: सेमीचे स्वप्न पाऊस घेऊन जाणार? सामन्यावर सावट, पहा वेदर अपडेट

बंगळुरुतील स्टेडिअमवर हा सामना होत आहे. थोड्याच वेळात सामना सुरु होईल. लहान आकाराच्या या ग्राऊंडमध्ये पिच आणि हवामान हे दोनच खेळ करण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 10:16 AM

Open in App

पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी आजचा सामना करो या मरोचा आहे. दोघांनाही सेमीमध्ये जाण्यासाठी आज झुंजावे लागणार आहे. जो जिंकेल त्याच्या सेमीच्या आशा पल्लवित होणार आहेत. परंतू, दोन्ही संघांच्या सेमीतील प्रवेशावर पाऊस घोळ घालण्याची शक्यता आहे. 

बंगळुरुतील स्टेडिअमवर हा सामना होत आहे. थोड्याच वेळात सामना सुरु होईल. लहान आकाराच्या या ग्राऊंडमध्ये पिच आणि हवामान हे दोनच खेळ करण्याची शक्यता आहे. पिच फलंदाजीला पोषक असले तर मोठी धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे. पहिल्या डावातच हे शक्य होणार आहे. पावसाची शक्यता पहिल्या डावात नाहीय, तर दुसऱ्या डावात पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे टॉसवर बरेच काही अवलंबून असणार आहे. 

न्यूझीलंडने 7 सामन्यांतून 4 विजय आणि 3 पराभवांसह एकूण 8 गुण मिळविले आहेत. तसेच हा संघ सेमीच्या टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानी संघाने 7 सामन्यांत 3 विजय आणि 4 पराभवांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. बाबर आझमच्या संघाला सेमीमध्ये टिकून राहण्यासाठी आज न्यूझीलंडला हरवावे लागणार आहे.

बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असली तरी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते. नंतर ती फलंदाजांना उपयुक्त बनत जाते. सामन्यादरम्यान बेंगळुरूमध्ये दिवसाचे कमाल तापमान 27 अंश असेल. बंगळुरूचे आकाश १० वाजल्यापासून ढगाळ होण्यास सुरुवात होईल. दुपारी 1 नंतर पावसाची शक्यता 47 टक्के असल्याचे सांगितले जात आहे. संध्याकाळी पाच वाजता पावसाची शक्यता 56 टक्क्यांवर पोहोचेल. अशा स्थितीत पावसामुळे दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे समीकरण बिघडू शकते, अशी दाट शक्यता आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपपाकिस्तानन्यूझीलंड