Join us  

रिझवान, इफ्तिखार यांनी पाकिस्तानला तारले; भारताला भिडण्यासाठी जीव तोडून खेळले

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : आशिया चषकातील आव्हान टीकवण्यासाठीच्या महत्त्वाच्या लढतीत पाकिस्तानला मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी तारले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 9:22 PM

Open in App

Pakistan vs Sri Lanka Live Marathi : आशिया चषकातील आव्हान टीकवण्यासाठीच्या महत्त्वाच्या लढतीत पाकिस्तानला मोहम्मद रिझवान व इफ्तिखार अहमद यांनी तारले... श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना पाकिस्तानचा निम्मा संघ १३० धावांवर तंबूत पाठवला होता. दोन वेळा पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४२-४२ षटकांचा झाला अन् रिझवान व इफ्तिखार यांनी धावांचा पाऊस पाडला. या दोघांनी ७८ चेंडूंत १०८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही मॅच जिंकूनच त्यांना फायनलमध्ये भारताविरुद्ध खेळता येणार आहे आणि त्यासाठी या दोघांनी आज सर्वस्व पणाला लावले. 

नंबर १ बाबर आजम २० वर्षाच्या पोरासमोर झुकला; श्रीलंकेच्या गोलंदाजाने 'मामू' बनवला!

फखर जमान पुन्हा अपयशी ठरला अन् प्रमोद मदुशानने तिसऱ्या षटकात फखरचा ( ४) त्रिफळा उडवला. बाबर आजम आणि  अब्दुल्लाह शफिक यांनी ६४ धावांची भागीदारी करून डाव सावरला होता. पण, वेल्लालागेने पाकिस्तानी कर्णधाराची विकेट घेतली. बाबर ३५ चेंडूंत २९ धावांवर यष्टीचीत होऊन परतला. शफिकने अर्धशतक पूर्ण केले, परंतु मथीशा पथिराणाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. शफिक ६९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतला.   पथिराणाने स्वतःच्याच गोलंदाजीवर मोहम्मद हॅरीसचा ( ३) भन्नाट रिटर्न झेल टिपला. मोहम्मद नवाजचा ( १२) महीष थीक्षणाने त्रिफळा उडवला अन् पाकिस्तानचा निम्मा संघ १३० धावांत तंबूत परतला. पण, पावसाने थोड्यावेळासाठी व्यत्यय आणला होता. त्यामुळे पुन्हा ३ षटकं कमी झाली अन् ४२-४२ षटकांची मॅच रंगली.

मोहम्मद रिझवानला दिलेलं जीवदान महागात पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इफ्तिखार अहमदही मदतीला होता. मदुशानने टाकलेल्या ३३व्या षटकात या दोघांनी १८ धावा कुटल्या. रिझवानने ४८ चेंडूंत वन डे तील १२वे अर्धशतक पूर्ण केले. वेल्लालागेच्या षटकात त्याने ६-४ खेचले आणि इफ्तिखारसह सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. थीक्षणाच्या चेंडूवर इफ्तिखार LBW होता परंतु श्रीलंकेने DRS न घेतल्याने तो वाचला. रिझवान व इफ्तिखार यांना गवसलेला सूर श्रीलंकेचं टेंशन वाढवून गेला अन् दोघांनी १०८ धावांची भागीदारी करून पाकिस्तानला ७ बाद २५२ धावांपर्यंत पोहोचवले. इफ्तिखार ४० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला. पथिराणाने ३ अन् मदुशाने २ विकेट्स घेतल्या. रिझवान ७३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ८६ धावांवर नाबाद राहिला.

 

टॅग्स :एशिया कप 2023पाकिस्तानश्रीलंका