Join us  

इंग्रजी वाक्याचा केला बेक्कार झोल अन् पाकिस्तानी विकेट कीपर 'वाईट्ट' ट्रोल!

इंग्रजी लिहिताना अजूनही काहींचा गोंधळ होतो आणि ते नेटिझन्सच्या तावडीत सापडतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:55 PM

Open in App
ठळक मुद्देउमर अकमलने माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकसोबतचा एक फोटो ट्विट केला.त्याला कॅप्शन देताना अकमलने Mother from another Brother अशी ओळ लिहिली.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंचं इंग्रजी भाषेवरचं 'प्रभुत्व' आपल्याला ठाऊकच आहे. 'बॉईज प्लेड वेल' या ठरलेल्या वाक्यानंतर त्यांची उडणारी भंबेरी आपण पाहिलीय. अर्थात, या अनुभवातून शहाणे झालेले क्रिकेटपटूही आहेत. त्यांच्यातील बरेच जण समालोचकही झालेत. पण, इंग्रजी लिहिताना अजूनही काहींचा गोंधळ होतो आणि ते नेटिझन्सच्या तावडीत सापडतात. पाकिस्तानचा यष्टिरक्षक उमर अकमलनं काल नेटकऱ्यांच्या हाती आयतंच कोलित दिलं.

झालं असं की, उमर अकमलने माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकसोबतचा एक फोटो ट्विट केला. या फोटोला कॅप्शन देताना, मोबाईल स्क्रीनवर त्याची बोटं घसरली ('जीभ घसरली'च्या धर्तीवर) की त्याची 'अक्कलच गवत खायला गेली होती' माहीत नाही; पण त्याने Brother from another mother ऐवजी Mother from another Brother अशी ओळ लिहिली. मग काय, खेळ खल्लासच झाला ना राव! 

चुका काढण्यात तरबेज असलेल्या नेटिझन्सनी आधी या ट्विटचा स्क्रीन शॉट काढला आणि मग अकमलची 'वाईट्ट' शाळा घेतली. त्यानंतर, अकमलने आपल्या ट्विटर हँडलवरून हे ट्विट डिलीट करून टाकलंय, पण स्क्रीन शॉट जोरात फिरताहेत. त्यावरून भारी भारी मीम्सही बनलेत. त्यातून अकमलची कशी खिल्ली उडवली गेलीय, तुम्ही स्वतःच बघा!

 

टॅग्स :उमर अकमलट्विटरसोशल व्हायरलसोशल मीडियापाकिस्तान