Asia Cup 2023 : आम्हाला आशिया चषक आणि वन डे विश्वचषक जिंकायचाच आहे - बाबर आझम

बुधवारपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 06:56 PM2023-08-29T18:56:28+5:302023-08-29T18:57:33+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan will not take Nepal lightly, We want to win the Asia Cup and the World Cup 2023 says Babar Azam | Asia Cup 2023 : आम्हाला आशिया चषक आणि वन डे विश्वचषक जिंकायचाच आहे - बाबर आझम

Asia Cup 2023 : आम्हाला आशिया चषक आणि वन डे विश्वचषक जिंकायचाच आहे - बाबर आझम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : बुधवारपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. सलामीचा सामना उद्या यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होत आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमनं विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. आम्ही नेपाळला हलक्यात घेत नसून उद्याच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं बाबरनं म्हटलं. 

नेपाळविरूद्धचा सामना झाल्यानंतर पाकिस्तानी संघ ३१ ऑगस्ट रोजी भारताविरूद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होईल. भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी २ सप्टेंबरला आमनेसामने असतील. अफगाणिस्तानला वन डे मालिकेत पराभूत करून पाकिस्तानी संघाने वन डे क्रमवारीत अव्वल स्थान गाठलं आहे. "आम्ही वेळ आल्यावर भारताविरूद्धच्या सामन्याबद्दल रणनीती आखू. मी जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हाच ठरवलं की संघाची विचारसरणी बदलायची आणि त्यात मला यश आल्याचं दिसतं", असं बाबर आझमनं म्हटलं. 

"आशिया चषक आणि विश्वचषक जिंकायचाय"
तसेच आम्हाला आशिया चषक आणि वन डे विश्वचषक जिंकायचा आहे. आमच्यासाठी पुढचे काही महिने स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक असतील. पण, आम्ही आमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू, असंही बाबरनं सांगितलं. 

आशिया चषकासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उस्मान मीर, फहीम अशरफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सौद शकील, शाहीन आफ्रिदी. (राखीव - तैय्यब ताहिर)
 
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल 

Web Title: Pakistan will not take Nepal lightly, We want to win the Asia Cup and the World Cup 2023 says Babar Azam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.