पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार; Asia Cup आमच्याशिवाय कसा होतो ते बघतोच!

ICC World Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेवरून भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला वाद आणखी चिघळला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 07:49 PM2023-05-11T19:49:19+5:302023-05-11T19:49:48+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan will not travel to India for the World Cup, we want our World Cup matches to be played at a neutral venue only," PCB chairman Najam Sethi | पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार; Asia Cup आमच्याशिवाय कसा होतो ते बघतोच!

पाकिस्तानचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्यास नकार; Asia Cup आमच्याशिवाय कसा होतो ते बघतोच!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC World Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेवरून भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला वाद आणखी चिघळला आहे. आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होती, परंतु BCCI ने कोणत्याही परिस्थितीत टीम इंडियाला न पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) आगपाखड झालीय. PCBचे अध्यक्ष नजम सेठी ( Najam Sethi) यांनी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार नसल्याचे सांगून आमचेही सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावेत अशी मागणी केली आहे. शिवाय त्यांनी पाकिस्तानशिवाय आशिया चषक स्पर्धा होतेच कशी ते पाहू, असा धमकीवजा इशारा दिला आहे.

पाकिस्तानात सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे... माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेमुळे तेथील परिस्थिती अधिक बिघडली आहे. अशात बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठी भारताला पाकिस्तान दौऱ्यावर न पाठवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले जातेय. पण, पीसीबीने त्यासाठी हायब्रिड मॉडेल सुचवला होता आणि त्यानुसार भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा पर्याय त्यांनी दिला होता, परंतु तोही अमान्य करण्यात आल्याने आशिया चषक २०२३ श्रीलंकेत खेळवण्यात येईल, अशी शक्यता निर्माण झालीय. 

आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद हातातून जातानाचे दिसताच पीसीबी अध्यक्ष बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. ''दंगे, राजकिय कार्यक्रमातही भारताता क्रिकेट कधीच थांबले नाही. आमच्या देशात सध्या राजकिय अस्थितरता आहे, परंतु भविष्यात ते तसेच राहणार नाही. आम्ही प्रत्येक संघाला VVIP सुरक्षा दिलीय आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे येऊन खेळून गेले आहेत,''असे सेठी स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाले. 
 

श्रीलंकेत जेव्हा नुकतेच दहशतवादी हल्ले होऊन गेले होते, तेव्हा आम्ही तेथे क्रिकेट खेळायला गेलो होते. आम्ही कोठेही खेळण्यास तयार असतो, असेही सेठी यांनी नमुद केले. बहरिन येथे झालेल्या बैठकीबाबत सांगताना ते म्हणाले, जय शाह यांनी त्या बैठकीत प्रत्येकाला विचारले की पाकिस्तानात खेळण्यासाठी तयार आहात का. बांगलादेशनेही स्पष्ट सांगितले की पाकिस्तानशिवाय आशिया चषक होऊ शकत नाही. पाकिस्तानशिवाय आशिया चषक कसा होते, ते आम्ही बघतोच. आमच्याशिवाय आशिया चषक नाहीच. भारत-पाकिस्तान सामन्यातून मोठा महसूल मिळतो.  

पाकिस्तानवर बंदी घातली जाईल का?
आयसीसी आमच्यावर बंदी घालू शकत नाही. जर आम्ही एखाद्या देशात सुरक्षेच्या कारणावरून जात नसू तर आमच्यावर बंदी घातली जाईल, असा कोणताच नियम नाही. आम्ही याच करणामुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही, हेही सेठी यांनी स्पष्ट केले.  

Web Title: Pakistan will not travel to India for the World Cup, we want our World Cup matches to be played at a neutral venue only," PCB chairman Najam Sethi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.