पाकिस्तान भारतात खेळेल, आयसीसीने व्यक्त केला विश्वास

India Vs Pakistan: वन-डे विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठविण्यास पीसीबी अद्याप मागेपुढे करीत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पाकिस्तान संघ भारतात सामने खेळेल, असा विश्वास व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:08 AM2023-06-28T06:08:47+5:302023-06-28T06:09:07+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan will play in India, ICC expresses confidence | पाकिस्तान भारतात खेळेल, आयसीसीने व्यक्त केला विश्वास

पाकिस्तान भारतात खेळेल, आयसीसीने व्यक्त केला विश्वास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली / कराची : वन-डे विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठविण्यास पीसीबी अद्याप मागेपुढे करीत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पाकिस्तान संघ भारतात सामने खेळेल, असा विश्वास व्यक्त केला. विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होताच पीसीबीने सरकारच्या मंजुरीनंतरच आमचा संघ भारतात खेळू शकेल, असे जाहीर केले. एक अधिकारी म्हणाला, ‘१५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे आणि उपांत्य फेरी गाठल्यास मुंबईत खेळणे सरकारच्या मंजुरीवर विसंबून असेल.

दुसरीकडे, आयसीसीचे प्रवक्ते म्हणाले, ‘सर्व सदस्य देशांना आपल्या देशाच्या कायद्याचे पालन करायचे आहे, आम्हीदेखील सन्मान करतो.’ तथापि, पाकिस्तान संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येईल,असा आम्हाला विश्वास वाटतो.’
पीसीबी अध्यक्षपदाची निवडणूक १७ जुलैपर्यंत लांबणीवर गेली. त्यामुळे पीसीबी वेळापत्रकावर काय प्रतिक्रिया देईल, हे पाहावे लागेल. नजम सेठी यांच्या राजीनाम्यानंतर बोर्डाचे काम  अंतरिम अध्यक्ष अहमद शहजाद फारूक राणा हे पाहत आहेत.
पाकने २०१६ चा विश्वचषक भारतात खेळला होता. उभय देशांतील राजकीय संबंध विकोपाला गेल्यामुळे दोन्ही देश आशिया चषक किंवा आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. पाकची विनंती अमान्य होणार हे ठरले होते. कारण, सुरक्षेचा धोका असेल तरच सामने हलविले जातात.

Web Title: Pakistan will play in India, ICC expresses confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.