पाकिस्तान संघानं घरच्या मैदानावर दहा वर्षांनी झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांनी वर्चस्व गाजवला. पाकिस्ताननं दुसरा सामना 263 धावांनी जिंकला. या विजयासह पाकिस्ताननं दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली. शिवाय आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
पाकिस्तान आणि
श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. कराची येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पाकिस्तानचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळून श्रीलंकेनं 271 धावा केल्या. पण, पाकिस्ताननं दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. शान मसूद आणि अबीद अली यांनी शतकी खेळी केली, परंतु अबीदचे शतक पराक्रमी ठरले. मसूद आणि अबीद यांच्यानंतर कर्णधार अझर अली आणि बाबर आझम यांनीही शतक झळकावलं. त्यांच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं 3 बाद 555 धावांवर दुसरा डाव घोषित केला.
आफ्रिदीचा प्रताप; पत्रकारावर वर्णद्वेषी टिप्पणी, ICC कडे करणार तक्रार
वाह रे पठ्ठ्या; पाकच्या अबीद अलीची तुफान फटकेबाजी; आशियाई फलंदाजांत ठरला 'दादा'!
मसूदने 198 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 135 धावा केल्या. अबीदनं 281 चेंडूंत 21 चौकार व 1 षटकार खेचून 174 धावा, अझर अलीनं 157 चेंडूंत 13 चौकारांसह 118 धावा आणि बाबरनं 131 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 100 धावा केल्या. त्यांनी श्रीलंकेसमोर 476 धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 212 धावांत गडगडला. श्रीलंकेकडून ओशादा फर्नांडोनं 180 चेंडूंत 13 चौकारांसह 102 धावांची खेळी केली. त्याला निरोशान डिकवेलानं 65 धावा करताना साथ दिली, परंतु या दोघांचे प्रयत्न अपूरे पडले. पाकिस्तानच्या नसीम शाहन 31 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानच्या अबीद अलीचा पराक्रम अन् थेट रोहित शर्माशी बरोबरी
या विजयासह पाकिस्ताननं खात्यात 60 गुणांची भर घातलाना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. या गुणतालिकेत टीम इंडिया 360 गुणांसह अव्वल, तर ऑस्ट्रेलिया 216 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, पाकिस्तानच्या खात्यात 80 गुण जमा झाले आहेत. त्यानंतर श्रीलंका ( 80 गुण), न्यूझीलंड ( 60) आणि इंग्लंड ( 56) यांचा क्रमांक येतो. वेस्ट इंडिड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांची पाटी अजून कोरीच आहे.
Web Title: Pakistan win by 263 runs against Sri Lanka, climb to third in the World Test Championship table
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.