Join us  

IND vs PAK : पाकिस्तानी महिला संघाने भारताला हरवले अन् Shoaib Malik पासून अनेकजणं 'झिंदाबाद' चे नारे देऊ लागले

Women's Asia Cup 2022, India vs Pakistan : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 5:59 PM

Open in App

Women's Asia Cup 2022, India vs Pakistan : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून हार मानावी लागली. दोन दिवसांपूर्वी हाच पाकिस्तानचा संघ दुबळ्या थायलंडकडून पराभूत झाला होता. त्याच संघाने जबरदस्त पुनरागमन करताना भारतीय महिला संघाचा विजयरथ अडवला. पाकिस्तानच्या महिला संघाने १३ धावांनी जिंकला. ५६ धावा केल्या आणि २ विकेट्स घेणारी निदा दार विजयाची शिल्पकार ठरली. महिलांच्या या विजयी कामगिरीनंतर शोएब मलिक, वासीम अक्रम, हसन अलीसह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी कौतुक केले आणि #PakistanZindabad चे नारे दिले. 

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरूफने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. निदा दारने ३७ चेंडूंत नाबाद ५६ धावांची खेळी करताना संघाला ६ बाद १३७ धावा करून दिल्या. भारताच्या दीप्ती शर्मा ( ३-२७) व पूजा वस्त्राकर ( २-२३) यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पण, फलंदाजीत भारताने मार खाल्ला.. स्मृती मानधना ( १७), जेमिमा रॉड्रीग्ज ( २), दीप्ती ( १६) व कर्णधार हरमनप्रीत कौर ( १२) आज अपयशी ठरल्या. दयालन हेमलथा ( २०)  व रिचा घोष  ( २६) यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण भारताचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत १२४ धावांत तंबूत परतला. नर्शा संधूने तीन, सादीया इक्बाल व निदा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

महिलांच्या या विजयानंतर पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा पाऊस पाडला अन् #PakistanZindabad हा ट्रेंड सुरू केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय महिला क्रिकेट संघशोएब मलिकवसीम अक्रमएशिया कप 2022
Open in App