पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम

Mohammad Rizwan Pakistan, T20 World Cup 2024 PAK vs CAN: मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकाने पाकिस्तानचा कॅनडावर ७ गडी राखून विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 09:56 AM2024-06-12T09:56:42+5:302024-06-12T09:59:50+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan won against Canada but Mohammad Rizwan made slowest fifty in t20 int history | पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम

पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mohammad Rizwan Pakistan, T20 World Cup 2024 PAK vs CAN: पाकिस्तानच्या संघाने पहिल्या दोन सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर अखेर मंगळवारी विजयाचे खाते उघडले. टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय पाकिस्ताननेकॅनडाविरूद्ध मिळवला. याआधी यजमान अमेरिका आणि भारत या दोन संघांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. कॅनडाविरूद्धच्या सामन्यातही मात्र पाकिस्तानने ७ गडी राखून विजय साजरा केला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने एक अतिशय विचित्र आणि लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला.

IPL मध्ये पहिल्या सात-आठ षटकांत संघ शतक गाठायचे. पण T20 वर्ल्ड कपची कहाणी पूर्णपणे उलट आहे. येथे संघांना पूर्ण २० षटके खेळूनही १०० धावांचा टप्पा गाठत येत नाहीये. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी यात सर्वात कठीण आहे. या मैदानावर आतापर्यंत ७ सामने झाले असून टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतकांचा विक्रम दोनदा मोडला गेला. कॅनडाविरूद्धच्या सामन्यात टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर नोंदवला गेला. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल ५२ चेंडूत घेतले.

डेव्हिड मिलरच्या नावे होता विक्रम

सर्वात संथ अर्धशतकाचा विक्रम याआधी डेव्हिड मिलरच्या नावे होता. याच विश्वचषकात हा प्रकार घडला होता. डेव्हिड मिलर हा असा खेळाडू आहे ज्याने  आंतरराष्ट्रीय टी२०च्या इतिहासात अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावले आहे. पण या विश्वचषकात त्याने ५० चेंडूत अर्धशतक झळकावले. नेदरलँड्सविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत होता. त्यावेळी मिलरने ५० चेंडूत ५० धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान, पाकिस्तान-कॅनडा सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली. त्यांनी कॅनडाला १०६ धावांवर रोखले. कॅनडाकडून आरोन जॉन्सनने अर्धशतक (४४ चेंडूत) ठोकले तर मोहम्मद आमिरने १३ चेंडूत २ बळी टिपले. पाकिस्तानी संघाने पाठलाग करताना १७.३ षटकात १०७ धावा केल्या. मोहम्मद रिझवानने नाबाद ५३ धावा केल्या. तर डिल्लन हायलायगरने १८ धावांत २ बळी टिपले. अखेर पाकिस्तानने ७ बळी राखून सामना जिंकला.

Web Title: Pakistan won against Canada but Mohammad Rizwan made slowest fifty in t20 int history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.