नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) पाकिस्तानच्या संघाची घोषणा झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघ जाहीर करण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबरला संघ जाहीर केला. आशिया चषकात पाकिस्तानच्या संघाने शानदार कामगिरी केली होती. लक्षणीय बाब म्हणजे दुखापतीमुळे आशिया चषकाला मुकलेल्या शाहिन शाह आफ्रिदीचे टी-20 विश्वचषकासाठी पुनरागमन झाले आहे. पाकिस्तानचा संघ जाहीर होताच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघ निवड समितीवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. अशातच माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या संघावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवताना म्हटले, "पाकिस्तानचा संघ असा का जाहीर केला हे मला कळत नाही. बाबर आझमला सलामीवीर म्हणूनच खेळायचे आहे तो कोणाचे ऐकत नाही. संघाचे प्रशिक्षक सकलैन मुश्ताकला टी-२० मधील काय समजते हे मला माहित नाही, तो २००२ मध्ये क्रिकेट खेळला आहे. ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी कठीण असणार आहे, पाकिस्तानी फलंदाजांना दुबईच्या खेळपट्टीवर भुवनेश्वर कुमारचा चेंडू थोडासा वळत होता त्यामुळे समस्या झाली होती. अशी मधली फळी योग्य नसून यामुळे पाकिस्तानी संघ पहिल्या राऊंडमधूनच बाहेर होणार नाही ना याची मला भीती वाटते."
...तर पाकिस्तानच्या मॅनेजमेंटची हकालपट्टी होईल"तसेच पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार बाबर आझम क्लासिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. असे केल्याने त्याचा फॉर्म परत कसा येईल हेही कळत नाही. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानी संघाने चांगले प्रदर्शन केले नाही तर सर्वांची हकालपट्टी होईल. बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना देखील पदावरून पायउतार व्हावे लागू शकते, " अशा शब्दांत शोएब अख्तरने पाकिस्तानच्या मिडिल ऑर्डवरून पीसीबीवर निशाणा साधला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ते मोहम्मद वसीम यांना किती ज्ञान आहे याबाबत संभ्रम असल्याचे अख्तरने अधिक म्हटले.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.
पाकिस्तानचे विश्वचषकातील सामने 23 ऑक्टोबर - वि. भारत, मेलबर्न27 ऑक्टोबर - वि. ब गटातील विजेता, पर्थ30 ऑक्टोबर - वि. अ गटातील उपविजेता, पर्थ3 नोव्हेंबर - वि. दक्षिण आफ्रिका, सिडनी6 नोव्हेंबर - वि. बांगलादेश, एडिलेड