डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने पाकिस्तानच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू  

क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा एक दुर्देवी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या एका उदयोन्मुख खेळाडूचा डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने मृत्यू झाला. झुबेर अहमद असं या खेळाडूचं नाव आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 04:19 PM2017-08-16T16:19:47+5:302017-08-16T16:40:57+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan young cricketer zubair ahmed dies struck by bouncer | डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने पाकिस्तानच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू  

डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने पाकिस्तानच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपाकिस्तानच्या एका उदयोन्मुख खेळाडूचा डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने मृत्यू झाला. झुबेर अहमद असं या खेळाडूचं नाव आहे.  14 ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एका क्लब मॅचदरम्यान ही घटना घडली. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीबाबत योग्य अंदाज न आल्याने तो चेंडू थेट त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. फलंदाजी करताना झुबेरने हेल्मेट घातलं नव्हतं अशी माहिती समोर आली आहे.  

कराची, दि. 16 -  क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा एक दुर्देवी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या एका उदयोन्मुख खेळाडूचा डोक्यावर बाऊन्सर आदळल्याने मृत्यू झाला. झुबेर अहमद असं या खेळाडूचं नाव आहे. 

पाकिस्तानच्या फखर जमान अकादमीचा तो सदस्य होता. 14 ऑगस्ट म्हणजेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एका क्लब मॅचदरम्यान ही घटना घडली. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीबाबत योग्य अंदाज न आल्याने तो चेंडू थेट त्याच्या डोक्यावर जाऊन आदळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. फलंदाजी करताना झुबेरने हेल्मेट घातलं नव्हतं अशी माहिती समोर आली आहे.  

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.  झुबेर अहमदचा मृत्यू दुःखद आहे. खेळताना नेहमी हेल्मेट वापरावं आणि सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यायला हवी हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं पीसीबीने ट्विट करून म्हटलं आहे.

क्रिकेटच्या मैदानावर अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2014 साली देशांतर्गत सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा फलंदाजीदरम्यान डोक्यावर चेंडू आदळल्याने मृत्यू झाला होता. या अपघातानंतर संपूर्ण क्रिकेटविश्व दु:खाच्या सागरात बुडालं होतं.  वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट याचा उसळता चेंडू हूक करण्याच्या नादात डोक्‍याच्या मागील भागावर आदळला होता. या घटनेनंतर त्याला तातडीच्या प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिडनी हॉस्पिटलमध्ये त्याच्या डोक्‍यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतरही तो कोमामध्येच होता, अखेर त्याचा मृत्यू झाला. 
याशिवाय दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर थोडक्यात बचावला. जोश हेजलवूडच्या एका खतरनाक बाऊन्सरवर तो जखमी झाला. सराव सामन्यादरम्यान ही घटना घडली.  हेजलवूडच्या बाऊन्सरवर वॉर्नरने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला पण चेंडूच्या उसळीचा त्याचा अंदाज चुकला. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या मानेवर जाऊन आदळला आणि वॉर्नर खाली कोसळला.  

यापूर्वीच्या दुर्दैवी घटना 
-1998 मध्ये भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू कानावर लागल्याने जखमी. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू 
-1958-59 मध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक अब्दुल अझीज याला स्थानिक स्पर्धेत चेंडू छातीवर लागला. जागीच बेशुद्ध पडलेला अझीजचा रुग्णालयात जात असतानाच मृत्यू 
-1961-62 मध्ये भारताच्या नरी कॉण्ट्रॅक्‍टर यांना विंडीजच्या ग्रिपिथचा चेंडू डोक्‍याला लागला होता. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने कॉण्ट्रॅक्‍टर यांचा जीव वाचला, पण पुन्हा क्रिकेट खेळू शकले नाहीत. 
-2012 मध्ये सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक मार्क बाऊचर याच्या डोळ्याला इजा. त्यानंतर त्याची क्रिकेटमधून निवृत्ती. 
-2012 मध्ये झुल्फिकार भट्टी या पाकिस्तानी क्रिकेटपटूचा स्थानिक सामन्यात जिना स्टेडियमवर उसळता चेंडू छातीत लागला आणि त्याचा पिचवर मृत्यू झाला. 
-2013 मध्ये डेर्रीन रंडल दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा उसळणारा चेंडू डोक्‍यावर लागून मृत्यू झाला. 
 

आणखी वाचा - (हेजलवूडचा खतरनाक बाऊन्सर, थोडक्यात वाचला डेव्हिड वॉर्नर)


Web Title: Pakistan young cricketer zubair ahmed dies struck by bouncer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.