Join us  

Irfan Pathan: "जसा इरफान फक्त नावाचा पठाण आहे तसा...", पाकिस्तानी अभिनेत्री पुन्हा बरळली

पाकिस्तानी अभिनेत्री इरफान पठाणसह भारताची खिल्ली उडवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 3:40 PM

Open in App

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघाने पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आपल्या संघाच्या या विजयाने पाकिस्तानचे चाहते खूप खुश आहेत. आपला संघ अंतिम फेरीत पोहोचल्यावर माजी क्रिकेटपटूंपासून प्रत्येकजण खूप आनंदी आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने एक ट्विट केले होते. त्यावरून आता पाकिस्तानी चाहत्यांसह शेजारी देशातील अभिनेत्रीने इरफान पठाणची खिल्ली उडवली आहे. 

खरं तर इरफान पठाणने पाकिस्तानच्या विजयानंतर एक ट्विट करून शेजाऱ्यांच्या चाहत्यांना डिवचले होते. माजी गोलंदाजाने ट्विट करत लिहले, "शेजाऱ्यांचा विजय तर होत राहतो पण त्यांचा हा रूबाब नाही." अशा शब्दांत इरफानने शेजाऱ्यांना डिवचले होते. मात्र उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांसह अभिनेत्रीला भारतावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताविरूद्ध 10 गडी राखून मोठा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी चाहते भारतावर सडकून टीका करत आहेत. 

भारताकडे नावापुरताच रूबाब आहे - शिनवारी पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारीने ट्विटच्या माध्यमातून इरफानसह भारताची खिल्ली उडवली आहे. "जसा इरफान फक्त नावाचा पठाण आहे याचपद्धतीने भारताकडे रूबाब देखील फक्त नावापुरताच आहे. ते कालच्या पराभवाने सिद्ध केले आहे." अशा आशयाचे ट्विट करून पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतीय संघावर निशाणा साधला. 

पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणार अंतिम सामना इरफान पठाण सध्या ऑस्ट्रेलियात कॉमेंट्रीसाठी उपस्थित आहे आणि तो मैदानावर जाऊन सामन्याच्या आधी पोस्ट शो देखील करतो. पाकिस्तानी संघाबद्दल भाष्य करायचे झाले तर, शेजाऱ्यांनी सलामीचे दोन सामने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी संघ स्पर्धेतून बाहेर होणार असल्याची चर्चा होती. मात्र सलग सामने जिंकून आता पाकिस्तानी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांचा अंतिम सामना इंग्लंडच्या संघासोबत रविवारी होणार आहे.  

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानभारतइरफान पठाणभारतीय क्रिकेट संघ
Open in App