Join us  

"टीम इंडिया हरल्यावर जी मजा येते, तशी..."; पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतीय फॅन्सना डिवचलं

भारताला न्यूझीलंडने पहिल्या वन-डे मध्ये सहज हरवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 7:41 PM

Open in App

Pakistani Actress Sehar Shinwari, IND vs NZ 1st ODI: भारतीय संघाचा पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंड विरूद्ध पराभव झाला. अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वात भारताला सामना गमवावा लागला. श्रेयस अय्यरच्या ८०, शिखर धवनच्या ७२ आणि शुबमन गिलच्या ५० धावांच्या जोरावर भारताने ५० षटकात ७ बाद ३०६ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडच्या संघाने हा सामना ७ गडी राखून जिंकला. टॉम लॅथमच्या नाबाद १४५ आणि केन विल्यमसनच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १७ चेंडू राखून भारताचा पराभव केला. न्यूझीलंड जिंकल्याचा जितका आनंद त्यांच्या चाहत्यांना झाला. पण भारत हरल्याचा तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त आनंद पाकिस्तानी अभिनेत्रीला झाला. शेहर शेनवारीने खास ट्विट करत भारतीय चाहत्यांनी डिवचले.

भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. ३०० पार मजल मारूनही भारतीय गोलंदाजांना या लक्ष्याचा बचाव करणे शक्य झाले नाही. मायदेशात त्यांच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. त्यामुळे भारताचा पराभव झाला. त्यानंतर शेहर शेनवारीने विशेष ट्विट करत भारतीय खेळाडूंची खिल्ली तर उडवलीच, त्यासह चाहत्यांनाही डिवचलं. 'भारत हरल्यानंतर जी मजा येते, तशी मजा कोणत्याच सूरात किंवा तालात नाही,' असे ट्विट तिने केले.

दरम्यान, न्यूझीलंडने अनुभवाच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात पराभूत केले. भारताच्या ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात निराशाजनक झाली. पण,  कर्णधार केन विलियम्सन व टॉम लॅथम या जोडीने २००+ धावांची भागीदारी केली आणि मॅच जिंकली. शिखर धवनकडून सुटलेला झेल, शार्दूल ठाकूरने एका षटकात दिलेल्या २५ धावा अन् गोलंदाजांकडे अनुभवाची असलेली कमतरता यामुळे भारतीय संघाला हार मानावी लागली. उम्रान मलिक व अर्शदीप सिंग यांनी पदार्पणात चांगली कामगिरी केली, परंतु अनुभवातून हे गोलंदाज आणखी बहरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडशिखर धवनभारतपाकिस्तान
Open in App