icc world cup 2023, ind vs pak : आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून १५ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. तर, सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दरम्यान, मागील वर्षींच्या ट्वेंटी-२० विश्वचषकादरम्यान आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीचे आणखी एक ट्विट व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी संघ आगामी विश्वचषकात भारताचा पराभव करेल असा दावा करत तिने एक अजब विधान केले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने आपला अंदाज व्यक्त करताना म्हटले, "आगामी क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानचा संघ यावेळी भारतीय भूमीवर भारताचा पराभव करणार आहे. जर तसे झाले नाही तर माझे नाव बदला आणि मला सेहर ऐवजी 'इंडिया' म्हणा." शिनवारीच्या या ट्विटवर चाहते भन्नाट प्रतिक्रिया देऊन तिची फिरकी घेत आहेत.
ICC 2023 World Cup knockouts schedule -
- उपांत्य फेरी १ - मुंबई - १५ नोव्हेंबर.
- उपांत्य फेरी २ - कोलकाता - १६ नोव्हेंबर.
- अंतिम सामना - अहमदाबाद - १९ नोव्हेंबर.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू
विश्वचषकातील पाकिस्तानचे सामने -
- ६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर १, हैदराबाद
- १२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालियर २, हैदराबाद
- १५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
- २० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
- २३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान, चेन्नई
- २७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
- ३१ ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
- ४ नोव्हेंबर - न्यूझीलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
- १२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता