babar azam । नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू (Pakistan Cricket Team) खेळाडू शादाब खानने (Shadab Khan) कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानातील लोकांनी बाबर आझमची किंमत समजायला हवी असे शादाब खानने म्हटले आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडूने बाबर आझमची तुलना कोहिनूर हिऱ्यासोबत केली आणि तो त्याच्यापेक्षा मोठा असल्याचे म्हटले.
दरम्यान, बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उभारी घेतली आहे. खरं तर बाबर आझमची सरासरी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये 40 हून अधिक राहिली आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याला आईसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयर आणि आईसीसी क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता. मात्र, बाबर आझमच्या धीम्या खेळीवरून त्याच्यावर सतत टीका होत असते.
पाकिस्तानने बाबर आझमचा आदर केला पाहिजे - शादाब खान
शादाब खानने पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले, "मला वाटते की, आपण एवढ्या मोठ्या हिऱ्यावर अन्याय करतोय. पाकिस्तान खूप भाग्यवान आहे की त्यांना इतका मोठा हिरा मिळाला आहे. बाबर हा कोहिनूरपेक्षा मोठा हिरा आहे. एक राष्ट्र म्हणून बाबर आझमला हवा तसा आदर आम्ही देत नाही. आपण त्याच्यावर दबाव आणत आहोत. शेवटी तो फक्त माणूस आहे. ज्या प्रकारे संपूर्ण जग त्याचा आदर करते, आपणही त्याचा आदर केला पाहिजे. जेव्हा लोक त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उभे करतात तेव्हा मला आश्चर्य वाटते. तो पाकिस्तानचा सर्वात मोठा खेळाडू आहे. संघात आपण त्याचा आदर करतो, त्याचप्रमाणे आपल्या देशानेही त्याचा आदर केला पाहिजे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: pakistani all rounder shadab khan says that Babur Is Even A Bigger Diamond Than Kohinoor
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.