shaheen afridi injury । नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर झाला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी गुडघ्याच्या दुखापतीमुळे आफ्रिदीला आशिया चषकाच्या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. त्यादरम्यान त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. इंग्लंडविरूद्धच्या घरच्या मालिकेला मुकल्यानंतर त्याचे पाकिस्तानी संघात पुनरागमन झाले होते. विश्वचषकाच्या स्पर्धेत शाहिनने शानदार कामगिरी केली होती मात्र 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात शाहिनच्या दुखापतीने पुन्हा तोंड वर काढले आणि त्याला क्रिकेटपासून दूर केले.
आता पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 22 वर्षीय खेळाडूने सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांना याबाबतची माहिती दिली. शाहिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आज अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले, अलहमदुलिल्लाह बरे वाटत आहे. मला तुमच्या प्रार्थनेत लक्षात ठेवा." आयसीसीने देखील आफ्रिदीचा हा फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. खरं तर पाकिस्तानी संघ 1 डिसेंबरपासून इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
शाहिनच्या गैरहजेरीत पाकिस्तानची 'कसोटी'जुलैमध्ये झालेली पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 1-1 अशी अनिर्णित राहिली होती. त्यावेळी हसन अली, फवाद आलम आणि यासिर शाह हे या मालिकेचा हिस्सा राहिले होते. मात्र ते आगामी मालिकेचा हिस्सा नसणार आहेत. वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. खरं तर शाहिनला 3 आठवडे विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.
इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुला शफिक, अबरार अहमद, अझहर अली, फहीम अशरफ, हारिस रौफ, इमाम उल हक, मोहम्मद अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नौमान अली, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शान मसूद आणि झाहिद महमूद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"