Join us  

बाबर आजमने 'हे' काय ट्विट केले? SKY लिहिल्याने नेटिझन्सनी पाकिस्तानच्या कर्णधाराला ट्रोल केले

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आजच ट्वेंटी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. त्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने निर्विवाद वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 3:03 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आजच ट्वेंटी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. त्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने निर्विवाद वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान कायम राखले. मार्च २०२१मध्ये सूर्यकुमारने ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले आणि अल्पावधीत तो नंबर वन फलंदाज बनला. २०२२ या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक ११६४ धावा त्याने केल्या. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारच्या या झंझावाताने पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांची ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीतील मक्तेदारी संपुष्टात आली. त्यात आज क्रमवारी जाहीर केल्यानंतर कर्णधार बाबर आजमने ( Babar Azam) ट्विट केले आणि त्यावरून त्याला ट्रोल केले जातेय.

नाद करायचा नाय! सूर्यकुरमाचा ICC Rankings मध्ये कल्ला; पाकिस्तानी स्टार 'सूर्या'च्या आसपासही नाहीत

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सूर्यकुमार ८९० रेटींग पॉईंटसह अव्वल स्थानावर कायम आहे. त्याने ५४ पॉईंट्सच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावरील मोहम्मद रिजवानला ( ८३६ पॉईंट) मागे टाकले आहे. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे ( ७८८) याने पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( ७७८) याला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले.  इशान किशननेही १० स्थानांच्या सुधारणेसह ३३ वा क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स १ स्थान वर, तर केन विलियम्सन ५ स्थान वर सरकून अनुक्रमे सातव्या व ३५ व्या क्रमांकाव आले आहेत. भारतीय संघात सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स ८९७ हे विराटच्या खात्यात आहेत, त्यानंतर सूर्यकुमार ( ८९५) व लोकेश राहुल ( ८५४) यांचा क्रमांक येतो. 

बाबर आजमने ट्विट केले की, ''निळ्या आकाशाखाली निवांत ( Relaxing under the blue sky )'' नेटिझन्सनी आजमच्या ट्विटमधील skyचा संदर्भ SKY म्हणजेच सूर्यकुमार यादवशी लावला अन् त्याला ट्रोल केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवबाबर आजम
Open in App