Join us  

शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; म्हणाला, "नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना होणार नाही"

शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात वादग्रस्त विधाने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 11:17 AM

Open in App
ठळक मुद्देशाहिद आफ्रिदीने भारताविरोधात वादग्रस्त विधाने केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर मुद्द्यांवरून शाहिद आफ्रिदी बरळला होता. 'पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) पूर्णपणे पाकिस्तानमध्ये आयोजित केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) आभार'

पाकिस्तानचा माजी अष्ठपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. "जोपर्यंत भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होणार नाही", असे म्हणत शाहिद आफ्रिदी याने नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

शाहिद आफ्रिदी म्हणाला, "मला वाटत नाही की, मोदी सत्तेत असताना आपल्याला भारताकडून कोणतेही उत्तर मिळणार नाही. आता आम्हाला मोदींची मानसिकता समजली आहे. दोन्ही देशांतील जनतेला असे वाटत नाही. मात्र, एक व्यक्ती दोन्ही देशांतील संबंध बिघडू शकतो."  याचबरोबर, शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) पूर्णपणे पाकिस्तानमध्ये आयोजित केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) आभार मानले.

"पीएसएल पाकिस्तानात परत येणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. श्रीलंका, बांगलादेशसह अनेक टीम पाकिस्तानमध्ये आल्याचे आम्ही पाहिले आहे. क्रिकेट पाकिस्तानमध्ये परत येईल, अशी आमची खात्री आहे. पीएसएलचे पाकिस्तानमध्ये आयोजन करणे ही मोठी बाब आहे," असे शाहिद आफ्रिदी म्हणाला. 

दरम्यान, याआधीही शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात वादग्रस्त विधाने केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर मुद्द्यांवरून शाहिद आफ्रिदी बरळला होता. याशिवाय, गेल्या आठवड्यात  भारत पाकिस्तानबरोबर व्यापार करते. भारतीय पाकिस्तानमधील कांदे-टॉमेटो खातात, मग आमच्याबरोबर क्रिकेटची मालिका खेळायला तुम्हाला काय समस्या आहे, असा सवाल भारताचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला होता.  

टॅग्स :शाहिद अफ्रिदीनरेंद्र मोदी