Join us  

भारताची कन्या अन् पाकिस्तानची सून कपड्यांवरून झाली ट्रोल; क्रिकेटपटूचा वाढला ताप

गतवर्षी दुबईत झाला होता विवाह..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:15 PM

Open in App

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यानंतर पाकिस्तानच्या आणखी एका क्रिकेटपटूनं भारतीय मुलीशी लग्न केलं. पाकिस्तानाच गोलंदाज हसन अलीनं गतवर्षी हरयाणाच्या सामिया आरझू हिच्याशी विवाह केला. लग्नापासून ही जोडी सतत सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. लग्नांतरची त्यांचा हा पहिलाच ईद सण आहे आणि या दोघांनी एकत्रित फोटो शेअर करताना सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यांच्या या फोटोवरून ट्रोलर्सनं क्रिकेटपटूच्या पत्नीला ट्रोल केलं.  

सामिया आणि हसन यांनी गतवर्षी ऑगस्टमध्ये दुबईत विवाह केला. हरयाणात जन्मलेली सामिया मागील तीन वर्षांपासून दुबईत एअर अमीरातीमध्ये काम करत आहे. ती  एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून सामिया दुबईतच स्थायिक आहे. तिचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात. 

पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाहबद्ध होणारी सामिया ही चौथी भारतीय मुलगी आहे. यापूर्वी झाहीर अब्बास, मोहसीन खान, शोएब मलिक यांनी भारतीय महिलांशी विवाह केला आहे. हसननं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानं चार सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या होत्या, पण 38 षटकांत त्यानं 256 धावा दिल्या. हसननं आतापर्यंत 53 वन डे आणि नऊ कसोटी सामन्यांत एकूण 88 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 30 सामन्यांत 35 विकेट्स आहेत.

या दोघांनी शेअर केलेल्या फोटोत आरझू सुंदर दिसत आहे, परंतु नेटिझन्सनी तिची ही स्टाईल जुनी असल्याचा दावा करताना तिला ट्रोल केले.  

अन्य महत्त्वाच्या गोष्टी

... म्हणून आयपीएल-13 खेळवायला हवी; टीम इंडियाच्या 'गब्बर'चं लय भारी लॉजिक

उसेन बोल्टवर ब्रिटिश मॉडलचे गंभीर आरोप; प्रेयसी गर्भवती असताना करायचा अश्लील मॅसेज

ईदच्या निमित्तानं इरफान पठाणनं देशवासियांना दिल्या अशा शुभेच्छा, पाहा Video 

क्रीडा विश्वात हळहळ! तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारे बलबीर सिंग यांचे निधन

Video : दिव्यांग मुलाची गोलंदाजी पाहून व्हीव्हीएस लक्ष्मण थक्क; तुम्हीही पडाल प्रेमात 

इरफान पठाणच्या प्रेमात आकंठ बुडाली होती पाकिस्तानी महिला; त्याच्यासाठी ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचली अन्...

टॅग्स :पाकिस्तानसोशल व्हायरल