Join us

पाकिस्तानी क्रिकेटरला ICCचा दणका! दुसऱ्या खेळाडूशी गैरवर्तन केल्याने मोठा दंड

Pakistani Cricketer Fined, PAK vs NZ: दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी आयसीसीने खुशदिलला ही शिक्षा दिली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:12 IST

Open in App

Pakistani Cricketer Fined, PAK vs NZ: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू खुसदिल शाहवर मोठी कारवाई केली आहे. खुसदिल शाहने आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल २चे उल्लंघन केल्याचे आढळल्याने त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनापैकी ५०% दंड ठोठावण्यात आला आहे.

खुशदिलने काय चूक केली?

रविवारी क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यादरम्यान ही घटना घडली. खुसदिल शाहने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.१२ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. पाकिस्तानच्या डावाच्या ८व्या षटकात खुसदिल शाहने गोलंदाज झाचेरी फॉल्क्सच्या पाठीवर बॉल मारला, तेव्हा ही घटना घडली. खुसदिल शाहच्या कृतीला 'अयोग्य शारीरिक संपर्क आणि बळजबरी' या वर्गातील गुन्हा ठरवण्यात आला. खुसदिलने पंच आणि सामनाधिकारी जेफ क्रो यांनी लादलेली शिक्षा मान्य केली, ज्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

दंडासोबतच खुसदिलच्या रेकॉर्डमध्ये तीन डिमेरिट पॉइंट्स देखील जोडले गेले आहेत. २४ महिन्यांच्या कालावधीत हा पहिलाच गुन्हा होता. जर २४ महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स जमा झाले तर खेळाडूला एक कसोटी, दोन वनडे किंवा दोन टी२० सामन्यांसाठी बंदी घालण्यात येते.

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंड