मुंबई : सध्याच्या घडीला एका क्रिकेटपटूने अवैध काम केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच त्याच्यावर क्रिकेट मंडळाने थेड बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी या क्रिकेटपटूने काही अवैध गोष्टी केल्या होत्या. त्यावेळीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण पुन्हा एकदा त्याच्याकडून अवैध गोष्ट पाहायला मिळाली आणि क्रिकेट मंडळाने त्याच्यावर थेट बंदीची कारवाई केली आहे. आता हा खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल...
हा खेळाडू पाकिस्तानचा आहे. या खेळाडूचे नाव मोहम्मद हफिझ. पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू म्हणून हफिझचे नाव घेतले जाते. पण हफिझच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्याची गोलंदाजीची शैली अवैध असल्याचा ठपका इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने ठेवला आहे. कारण हफिझ सध्या इंग्लंडमध्ये मिडलसेक्सकडून कौंटी क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना हफिझची गोलंदाजी अवैध असल्याचे पाहिले गेले. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे त्याची चाचणी होणार की त्याच्यावरील इंग्लंडमध्ये बंदी कायम राहणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.