Join us  

Shoaib Malik: शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला हवीत किती मुलं? सना जावेदनं थेट आकडा सांगितला

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे विभक्त झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:11 PM

Open in App

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे विभक्त झाले आहेत. सानियाशी घटस्फोट घेऊन मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे. खरं तर शोएबने तिसरे लग्न केले आहे. त्याची तिसरी पत्नी सना जावेद हिचे देखील या आधी लग्न झाले आहे. सना तिच्या पडद्यावरील आयुष्याशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिला एका मुलाखतीत तिचा होणारा नवरा कसा असावा याबद्दल विचारले असता तिने सांगितले होते की, पती हा आदर करणारा असावा, त्याचे चांगले करिअर असावे, त्याचे स्वत:चे काहीतरी असावे आणि जळका स्वभाव नसावा. 

कोण आहे सना जावेद?सनाचा जन्म २५ मार्च १९९३ रोजी सौदी अरेबिया येथे झाला. कराची विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तिने २०१२ साली 'शहर-ए-झात' मधून पाकिस्तानी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काला दोरीया, मुश्त-ए-खाक, डंक, रूसवाई, दार खुदा, आणि इंतजार सारख्या नाटकांमध्ये तिने कमालीची भूमिका साकारली आहे. अगदी लहान वयात तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत करिअरला सुरुवात केली. शोएब आणि सनाने काही जाहिरातींच्या शूटसाठी एकत्र काम केले होते. यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. शोएब-सनामध्ये तब्बल १२ वर्षांचे अंतर आहे.

सनाचे हे पहिले लग्न नसून तिचे याआधीही लग्न झाले आहे. २०२० साली उमैर जसवालसोबत सनाने निकाह केला होता. उमैर हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आहे. त्याबरोबरच तो अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत निर्माताही आहे. तो रॉक ब्रॅण्डचा प्रमुख गायक असून, त्याचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. पण सना आणि उमैर यांनी गेल्यावर्षी घटस्फोट घेतला.

सनाला हवीत किती मुलं? सना जावेदला २०१७ मध्ये एका मुलाखतीत तिला किती मुले हवी आहेत याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने मिश्किलपणे उत्तर देताना म्हटले, "मुलांबद्दल मी काही विचार केला नाही... पण मला वाटते की, 'बच्चा एक ही अच्छा है'."

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे. पण, कोरोना काळानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला. मग घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आणि चर्चांवर अखेर पडदा पडला.

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झापाकिस्तानलग्न