ठळक मुद्देपाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना दुबईमध्ये सुरु आहे.या सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझमने नाबाद 127 धावांची खेळी साकारली. पाकिस्तामधील एका महिला पत्रकाराने बाबरला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना सामना संपल्यावर जेव्हा खेळबद्दल विचारलं जातं, तेव्हा ते मुख्यत्वेकरून हिंदीमध्ये बोलतात. जग बदललं, पण तरीही पाकिस्तानी क्रिकेटपटूंची इंग्रजीची बोंबच असल्याची एक गोष्ट नुकतीच घडली आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना दुबईमध्ये सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझमने नाबाद 127 धावांची खेळी साकारली. हे आझमचे पहिलेच शतक ठरले. या शतकानंतर पाकिस्तामधील एका महिला पत्रकाराने बाबरला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. तिचं हे ट्विट पाहून मात्र बाबर चांगलाच खळवला.
झैनाब अब्बास या महिला पत्रकार असून त्या समालोचनही करतात. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "बाबर तू चांगला खेळ केलास. संघातील खेळाडू तुला प्रोत्साहन देत होते. त्याचबरोबर मिकी आर्थर यांना आपल्या मुलाचे शतक पाहून आनंद झाला होता."
बाबरने मिकी आर्थर यांच्याबद्दलच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला आणि तो झैनाब यांच्यावर चांगलाच बरसला. बाबर म्हणाला की, " तुम्ही बोलण्यापूर्वी विचार करायला हवा, त्याचबरोबर आपल्या मर्यादा तुम्ही ओलांडू नका. "
बाबरने झैनाब यांच्या बोलण्याचा शब्दश: अर्थ घेतला आणि त्याचा पारा चढला. काही प्रशिक्षक खेळाडूंना ' वेल प्लेड माय बॉय किंवा वेल डन माय बॉय'असे म्हणतात. या वाक्यांचा अर्थ प्रशिक्षक खेळाडूचे वडिल असतात, असा काढायचा नसतो. पण बाबरला मात्र ही गोष्ट उमगली नाही आणि या अज्ञानामुळेच तो झैनाब यांच्यावर बरसला.
Web Title: Pakistani cricketer's English probleme, babar azam slams pakistani journalist
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.