कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे येत आहेत. श्रीलंका क्रिकेट मंडळानं त्यांच्या सरकारला 1 कोटी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंची त्यांच्या परागाची निम्मी रक्कम बांगलादेश सरकारला जमा करून दिली. आता पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि खेळाडूंनीही पुढाकार घेत देशातील कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात 4 लाख 71,820 लोकं संक्रमित झाले आहेत. त्यापैकी 21, 297 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 लाख 14,703 लोकं बरी झाली आहेत. पाकिस्तानात कोरोना रुग्णांचा आकडा 1000 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील काही भागांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुढे येऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. त्याच्या या समाजसेवेचं जगभरातून कौतुक होत आहे. विशेषतः भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानंही आफ्रिदीचं सोशल मीडियावर जाहीर कौतुक केलं.
आफ्रिदीनं घेतलेला पुढाकार पाहून आता पाकिस्तानी क्रिकेट मंडळाकडे ( पीसीबी) करारबद्ध खेळाडूंनी मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पाकिस्तान सरकारला 50 लाखांचा निधी देण्याची विनंती केली आहे. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी करारबद्ध खेळाडूंनी 50 लाखांची मदत करण्याची तयारी दर्शविल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याशिवाय पीसीबीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही एका दिवसाचा पगार देण्याचा ठराव केल्याचे, मणी यांनी सांगितले. त्याशिवाय वरिष्ठ पदावर काम करणारे दोन दिवसांचा पगार देतील.
''पीसीबी हा सर्व निधी गोळा करून सरकारच्या कोरोना व्हायरससाठीच्या फंडात जमा करणार आहे. अडचणीच्या परिस्थितीत पीसीबी नेहमी सरकारच्या मदतीला उभं राहिलं आहे,'' असे त्यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत
Shocking : आफ्रिकेच्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू
क्रीडा विश्व धावलं मदतीला, पण क्रिकेटचा देव अन् कॅप्टन कोहली करताहेत फक्त आवाहन!