कोरोना व्हायरसमुळे जगभरात तणावाचे वातावण आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 53,392 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 23,708 जणं बरी झाली असली तरी मृतांचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. आतापर्यंत 1 लाख 14, 253 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 9240 वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा 331 वर गेला आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंचा लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात कोरोना रुग्णांना तंदुरुस्त करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक अहोरात्र मेहनत घेत आहेत.
शाहिद आफ्रिदीनं गरळ ओकली; भारत-पाक मालिकेवरून पंतप्रधान मोदींवर 'बोचरी' टीका
पण, पाकिस्तानातील डॉक्टर्स कोरोना रुग्णांसमोर चक्क डान्स करत आहेत. भारताचा माजी सलामीवर गौतम गंभीरनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात PPE किट घातलेले डॉक्टर्स कोरोना रुग्णांसमोर चक्क डान्स करत आहेत. डान्स करून डॉक्टर रुग्णांचा मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. गंभीरनं हा व्हिडीओ शेअर करताना लिहीलं की, कोरोना जिथे कुठे आहेस ऐक... चिट्टा चोला...'' त्यानं पुढं नया पाकिस्तान असंही लिहीले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा
शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न
क्रिकेटला ब्रेक तरीही विराट कोहली टॉप; आयसीसीनं पोस्ट केली मजेशीर आकडेवारी
'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकाला लग्नाच्या हटके शुभेच्छा
...तर MS Dhoniची कोणत्या आधारावर टीम इंडियात निवड कराल?; गौतमचा 'गंभीर' सवाल