Virat Kohli, IND vs PAK : भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याचे संपूर्ण जगभरात असंख्य चाहते आहेत. जगातील दमदार फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराटला शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तानातही चाहत्यांची (Pakistani Fans) काहीच कमी नाही. पाकिस्तानातील चाहत्यांनी आणि काही क्रिकेटपटूंनी विराटबद्दल आपल्या भावना खुल्या दिलाने वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव पाहता या दोन देशातील क्रिकेट मालिका बंद आहेत, तसेच भारतीय संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठीही जात नाही. असे असूनही विराट हा अनेकांचा हिरो आहे.
ऐतिहासिक पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसर्या कसोटीदरम्यान कराचीच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये एका चाहत्याने भारतीय फलंदाज विराट कोहलीला आपला पाठिंबा दर्शवला. एक पाकिस्तानी चाहता हातात बॅनर घेऊन उभा असलेला दिसला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावर सध्याच्या घडीला कशीही कामगिरी करत असशील तरीही मी तुझा चाहता राहिन. 'प्रिय विराट, तू शतक केलंस किंवा नाही केलंस तरीही तू माझ्यासाठी कायम हिरो असशील', असं अब्दुल्ला अरिफ या पाकिस्तानी चाहत्याने लिहिलं.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाटिपण्णी होताना दिसत आहे. बऱ्याच वेळा भारतीय चाहतेही त्याच्यावर नाराजी व्यक्त करताना दिसतात. अशा वेळी पाकिस्तानी चाहते मात्र विराटवर आजही तितकंच प्रेम करतात हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. विराटने शतक झळकवावं अशी मागणी सातत्याने होत आहे. पण विराटने शतक ठोकलं नाही तरीही तो आपल्या नजरेत हिरोच राहिल, या एका पाकिस्तानमधील बॅनरमुळे विराटच्या चाहत्यांनाही बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं म्हटलं जातंय.