आपल्या समोर अचानक क्रिकेटपटू आला, तर सेल्फी घेण्याचा मोह कोणालाच आवरता येणार नाही. असाच एक अविस्मरणीय क्षण पाकिस्तान क्रिकेट संघाचा फॅन मुहम्मद शाहाब घुअरी याच्या वाट्याला आला. पाकिस्तानी गोलंदाज हॅरीस रौफ हा त्याच्यासमोर आला आणि मुहम्मदला सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. पण, या अविस्मरणीय क्षणानंनतर मुहम्मद समोर एक भयानक सत्य समोर आलं आणि त्याला मोठा धक्काच बसला.
एलिसा पेरीनं घेतला घटस्फोट, पण ट्रोल होतोय मुरली विजय; जाणून घ्या कारण!
पाकिस्तानचा क्रिकेटपटू सार्वजनिक ठिकाणी फिरताना मुहम्मदला आढळला आणि त्यानं त्वरित त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्या फॅनला माहीत पडलं की रौफला कोरोना झाला आहे. त्यानंतर आयुष्यातील मोठा धक्काच त्या चाहत्याला बसला. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघासोबर रौफला जाता आले नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) सहावेळा रौफची कोरोना चाचणी केली आणि त्यापैकी पाचवेळा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले.
रौफ इंग्लंड दौऱ्यावर का गेला नाही, याबाबत त्या फॅनला थोडं आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्यानं गुगल सर्च केला आणि त्याला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. रौफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्याला समजलं आणि त्याचं टेंशन वाढलं. रौफच्या जागी मोहम्मद आमीरला संघात संधी मिळाली.
दरम्यान,
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर आणखी एक संकट आले आहे. पाकिस्तान सरकार आणि ब्रॉडशीट LLC कंपनीतील जुन्या वादाचा फटका आता पाकिस्तान क्रिकेट संघाला बसणार आहे. या कंपनीनं इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघाची सर्व उपकरणं जप्त करण्याची धमकी दिली आहे. ब्रॉडकास्टर LLCची थकित रक्कम पाकिस्तान सरकारनं अजून दिलेली नाही. त्यामुळे ब्रॉडशीट LLCनं एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असून त्यात त्यांनी थकबाकी द्या अन्यथा पाकिस्तान संघाची सर्व उपकरणं जप्त करू, अशी धमकी दिली आहे.