Join us  

Shoaib Akhtar slams Babar Azam - इज्जतच ठेवली नाही राव! 'इंग्रजी' येत नसल्याने बाबर आजम मोठा ब्रँड झाला नाही; शोएब अख्तरची जोरदार टीका, Video 

Shoaib Akhtar slams Babar Azam - पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने कर्णधार बाबर आजमच्या संवाद कौशल्यावरून टीका केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:11 AM

Open in App

Shoaib Akhtar slams Babar Azam - पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने कर्णधार बाबर आजमच्या संवाद कौशल्यावरून टीका केली आहे आणि त्याला इंग्रजी बोलता येत नसल्याने तो मोठा ब्रँड बनू शकला नसल्याचे मत त्याने व्यक्त केले. ४७ वर्षीय शोएबच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे आणि त्याने क्रिकेटच्या मैदानावर खेळणे वेगळे अन् मीडियाशी संवाद साधणे वेगळे असे म्हणत दोन्ही जमलं पाहिजे असा सल्ला बाबरला दिला. बाबरला संवाद साधताच येत नसेल तर तो स्वतःच्या भावना कशा व्यक्त करेल, असा सवालही अख्तरने केला.  

पाकिस्तानातील स्थानिक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने बाबरसह पाकिस्तानी खेळाडूंच्या इंग्रजीची खिल्ली उडवली. तो म्हणाला,''प्रेझेंटेसन सेरेमनीमध्ये हे खेळाडू कसे गोंधळलेले पाहायला मिळतात. इंग्रंजी शिकणं आणि बोलणं किती अवघड आहे? क्रिकेट खेळणं वेगळं अन् मीडियाशी संवाद साधता येणं वेगळं. तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही तुमचं मत टीव्हीवर व्यक्त करण्यात अपयशी ठराल. बाबर आजम हा पाकिस्तानातील मोठा ब्रँड होऊ शकतो आणि हे मी दाव्याने सांगतो. पण, तो आतापर्यंत का मोठा ब्रँड होऊ शकला? कारण, त्याला इंग्रजी बोलता येत नाही.  

वासीम अक्रम आणि शाहिद आफ्रिदी यांनाच का जाहीराती मिळतात? कारण त्यांचं संवाद कौशल्य चांगलं आहे, असेही अख्तर म्हणाला.  

बाबर आजमपेक्षा डबल पगार घेते स्मृती मानधना 

भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ( Smriti Mandhana) ही महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) मुंबई इंडियन्सला कडवी टक्कर देताना स्मृतीला ३.४० कोटींत आपल्या ताफ्यात करून घेण्यात यश मिळवले.  महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ लिलावात बोली लागलेली ती पहिलीच खेळाडू होती आणि मुंबई इंडियन्सनेही तिच्यासाठी ३ कोटींपर्यंत बोली लावली होती.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमपेक्षास्मृती मानधनाचा पगार दुप्पट झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो सध्या पेशावर झल्मीकडून खेळतो आणि त्याला प्रत्येक हंगामात १.५० लाख डॉलर मिळत आहेत, पाकिस्तानी रुपयानुसार ही रक्कम ३.६० कोटींच्या पुढे जाते पण भारतीय रुपयात ही रक्कम मोजली तर ती १.५० कोटींपेक्षा कमी आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये ७ खेळाडूंना २ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळाली आहे.  बाबरच नव्हे तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान, शाहिन शाह आफ्रिदी यांना PSL मधून  मिळणारा पगार २ कोटींपेक्षा कमीच आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :बाबर आजमशोएब अख्तर
Open in App