कराची : भारत असो किंवा पाकिस्तान येथील क्रिकेटच्या प्रेमाला कोणतीच सीमा नाही. त्यामुळेच येथे प्रत्येक गल्लीत क्रिकेट खेळणारी मुले पाहायला मिळतात. पण, या गल्ली क्रिकेटमध्ये अनेकदा पंचांच्या निर्णय चुकीचे ठरतात आणि त्यामुळे हाणामारीचे प्रकारही घडतात. असाच एक पेचप्रसंग पाकिस्तानाच्या गल्ली क्रिकेटमध्ये उद्भवला आणि Out or Not Out वाद थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) कोर्टात पोहोचला. आयसीसीचं उत्तर येईपर्यंत अनेक तज्ज्ञांनी आपापली मतं मांडली.
पाकिस्तानमधील गल्ली क्रिकेटमधील या प्रसंगात मधला स्टम्प उखडला आहे, परंतु बेल्स कायम राहिल्याने फलंदाजाला बाद द्यायचे की नाही हा पेच निर्माण झाला. त्यामुळे त्या मुलांनी तो फोटो आयसीसीला टॅग करून उत्तर मागितले.
आयसीसीनं उत्तर दिलं की,''स्टम्पवरून बेल्स उडाल्या किंवा स्टम्स पूर्णपडे उखडला, तर फलंदाज बाद ठरतो असा नियम आहे. पण, स्टम्प उखडूनही बेल्स कायम राहिल्या तरी फलंदाज हा बादच ठरतो.''