Join us  

"बच्चो के हाथो ऑस्ट्रेलिया की धुलाई"; पाकिस्तानी मीडियाकडूनही टीम इंडियाच्या विजयाचं 'भारी' रिपोर्टिंग

India vs Australia : टीम इंडियानं मिळवलेल्या गॅबा कसोटीतील अशक्यप्राय विजयावर जगाला अजूनही विश्वास बसला नसेल कदाचित.

By स्वदेश घाणेकर | Published: January 20, 2021 1:25 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा ऑस्ट्रेलियात २-१ असा ऐतिहासिक मालिका विजयचौथ्या कसोटीत ३ विकेट्स राखून दणदणीत विजयशाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, वसीम अक्रम यांच्याकडूनही कौतुक

India vs Australia : टीम इंडियानं मिळवलेल्या गॅबा कसोटीतील अशक्यप्राय विजयावर जगाला अजूनही विश्वास बसला नसेल कदाचित. अनेक संकटांचा सामना करताना अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) आणि टीमनं ऑस्ट्रेलियावर २-१ असा मालिका विजय मिळवला आणि तोही त्यांच्याच घरच्या मैदानावर... टीम इंडियाच्या या विजयाची दखल जगभरातील प्रमुख वर्तमानपत्रांनी घेतलीच. आजच्या प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर टीम इंडियाचेच नाव दिसत आहे. पण, या विजयाची पाकिस्तान मीडियालाही दखल घेणे भाग पाडले. एरवी भारतीय खेळाडूंवर टीका करणारी ही मीडिया आज टीम इंडियाचं कौतुक करताना थकत नव्हती. पाकिस्तानी जनतेनंही टीम इंडियाचं भरभरून कौतुक केलं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

''बच्चो के हातो ऑस्ट्रेलिया की धुलाई, लोकल भाषेत असंच म्हणावं लागेल. शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत, मोहम्मद सिराज... यार सर्वांनी चांगला खेळ केला. कधी वर्णद्वेषी टीका, एकमागून एक खेळाडू जखमी होऊन संघाबाहेर जात होता, खरा कर्णधार पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला... बेस्ट एव्हर सीरिज विन!, या मालिकेत बरंच काही झालं... मालिकेपूर्वी सिराजच्या वडिलांचं निधन झालं... एक क्रिकेट चाहता म्हणून मी आज टीम इंडियाचा दिवाना झालोय...'', अशा प्रकारचं रिपोर्टींग अँकर करत होता. 

पाहा व्हिडीओ...

शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर आज म्हणतात...गॅबावर टीम इंडियानं ३२८ धावांचे लक्ष्य ३ विकेट्स राखून पार केले. शुबमन गिलनं ९१ धावा आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. रिषभ पंतनं नाबाद ८९ धावा करून विजयी कळस चढवला. भारताच्या या विजयानंतर शाहिद आफ्रिदीनं ट्विट केलं की, ''भारताची अश्विसनीय कामगिरी. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत्या संख्येमुळे एकामागून एक धक्के बसल्यानंतरही भारतानं कमबॅक केलं आणि विस्मयकारक मालिका विजय मिळवला. भारतीय संघाचे अभिनंदन. दीर्घकाळ हा मालिका विजय लक्षात राहिल.'' ''३६ ऑल आऊट ते मालिका विजय, वॉव,''असे शोएब अख्तरनं ट्विट केलं.  

पाकिस्तानच्या माजी जलदगती गोलंदाज आणि आक्रमक खेळाडू वसीम अक्रमनेही भारतीय संघाचं तोंड भरुन कौतुक केलंय. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीची वाहवा करताना तो जराही कमीपणा दाखवला नाही. 'वा इंडिया वा... अजिंक्य भारताचा अविश्वसनीय कसोटी सामना आणि मालिका विजय पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आजपर्यंत कुठल्याच आशियाई क्रिकेट संघात भारतीय संघासारखा हा धाडसी बाणा आणि धैर्यवान लढा दिसून आला नाही. फ्रंटलाईन खेळाडू जखमी झाले, तरी कुठलाच अडथळा भारतीय संघाला विजयापासून रोखू शकला नाही. विशेष म्हणजे 36 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतरही दुसऱ्या सामन्यातील हा विजय इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं वसीम अक्रमने म्हटलंय.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियापाकिस्तानशाहिद अफ्रिदीशोएब अख्तरवसीम अक्रम