"IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे...", पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

 IPL 2023 : पाकिस्तानी खेळाडूने आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 05:31 PM2023-04-10T17:31:11+5:302023-04-10T17:31:34+5:30

whatsapp join usJoin us
Pakistani player Saim Ayub says he would love to play for Virat Kohli-led Royal Challengers Bangalore in IPL | "IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे...", पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

"IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे...", पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL and PSL, Saim Ayub । नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा युवा खेळाडू सॅम अयुबने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल असा प्रश्न विचारला असता त्याने सॅम अयुबने म्हटले, "विराट कोहलीमुळे आरसीबीच्या संघाकडून खेळायला मला आवडेल. विराटने ज्याप्रकारे त्याचे करिअर बनवले आहे ते साहजिकच प्रेरणादायी आहे."

सॅम अयुब पाकिस्तानी संघाचा युवा फलंदाज आहे. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमच्या पेशावर झाल्मीच्या संघाचा भाग आहे. मात्र, त्याने पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघातून फारसे सामने खेळले नाहीत. त्याने एकूण ३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ६६ धावा केल्या आहेत. अलीकडेच पार पडलेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. 

"विराट कोहली जगातील सर्वात मोठ्या थलीटपैकी एक आहे"
पाकिस्तानाती युट्यूबर नादिर अलीच्या पॉडकास्टवर बोलताना अयुबने विराटचे तोंडभरून कौतुक केले. सॅम अयुबने आयपीएलबद्दल म्हटले, "मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास आरसीबीकडून खेळायला आवडेल, कारण विराट कोहली त्या संघाचा हिस्सा आहे. विराटने ज्या प्रकारे त्याचे करिअर बनवले आहे, तो युवा खेळाडूंसाठी आदर्श बनला असून मी त्याचा मोठा चाहता आहे. तो जगातील सर्वात मोठ्या थलीटपैकी एक आहे पण त्याला ज्याप्रकारे हाताळले जाते ते महत्त्वाचे आहे." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Pakistani player Saim Ayub says he would love to play for Virat Kohli-led Royal Challengers Bangalore in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.