ICC ODI World Cup 2023: पाकिस्तानी खेळाडूंना अद्याप मिळाला नाही भारताचा व्हिसा, वर्ल्डकप पूर्वी PAK ला मोठा झटका

ICC ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेला भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 11:05 AM2023-09-23T11:05:18+5:302023-09-23T11:06:33+5:30

whatsapp join usJoin us
Pakistani players did not get Indian visa a big blow to PAK before the ICC ODI World Cup 2023 | ICC ODI World Cup 2023: पाकिस्तानी खेळाडूंना अद्याप मिळाला नाही भारताचा व्हिसा, वर्ल्डकप पूर्वी PAK ला मोठा झटका

ICC ODI World Cup 2023: पाकिस्तानी खेळाडूंना अद्याप मिळाला नाही भारताचा व्हिसा, वर्ल्डकप पूर्वी PAK ला मोठा झटका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेला भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. २९ सप्टेंबरपासून विश्वचषक स्पर्धेचे सराव सामने होणार आहेत. दरम्यान, भारताला २०११ नंतर पुन्हा एकदा आपल्या देशात एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.

भारतात येणाऱ्या सर्व संघांचे व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला मात्र अद्याप भारत सरकारकडून व्हिसा मंजूर झालेला नाही. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाची दुबईला जाऊन खेळाडूंसोबत शिबिर घेण्याचा प्लॅन रद्द करण्यात आलाय. विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पाकिस्तानचे सर्व खेळाडू विश्वचषकपूर्व शिबिरासाठी दुबईला जातील. तेथून ते सर्वजण भारतात हैदराबादमध्ये दाखल होणार होते, असा पाकिस्तानी टीम मॅनेजमेंटचा प्लॅन होता, असं ईएसपीएननं म्हटलंय. यासाठी पाकिस्तानचा संघ यूएईला जाणार होता आणि तेथे काही दिवस घालवून नंतर भारतात येणार होते. मात्र आता ही प्लॅन रद्द करण्यात आलाय. दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यात आलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आठवड्याभरापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता, मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही.

आता हा असेल प्लॅन
व्हिसाच्या मंजुरीअभावी पाकिस्तानी क्रिकेट संघ लाहोरमध्ये मुक्काम करून २७ सप्टेंबरला दुबईला जाणार आहे. तेथून २९ सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी पाकिस्तानी संघ भारतात दाखल होईल. संघाला नियोजित वेळेत व्हिसा मिळेल, असा विश्वास पाकिस्तानी व्यवस्थापनानं व्यक्त केलाय.

पाकिस्तानी संघ
विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ २२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. बाबर आझमकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. तर शादाब खान उपकर्णधार असेल. नसीम शाहला दुखापतीमुळे संघात स्थान मिळवता आलेलं नाही. वेगवान गोलंदाज हसन अलीचं संघात पुनरागमन झालंय.

कोणाचा समावेश: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर. 

ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह: मोहम्मद हारिस, अबरार अहमद, जमान खान

Web Title: Pakistani players did not get Indian visa a big blow to PAK before the ICC ODI World Cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.