नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे पंतला आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.
दरम्यान, जगभरातील क्रिकेटपटू रिषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघातील खेळाडूंनी देखील पंतसाठी दुआ केली आहे. वसीम अक्रम, शोएब मलिक, मोहम्मद हफिज, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांसारख्या पाकिस्तानी खेळाडूंनी रिषभ पंतसाठी दुआ केली आहे. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "ऋषभ पंतसोबत काहीही गंभीर घडले नसावे अशी माझी अपेक्षा आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी मी शुभेच्छा देतो. भावा तुझ्यासाठी प्रार्थना. इंशा अल्लाह तू लवकर बरा होऊन मैदानात परतशील."
शादाब खानने पंतसाठी केली प्रार्थना
बीसीसीआय सहकार्य करणार पंतच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले, "माझ्या प्रार्थना ऋषभ पंतच्या पाठीशी आहेत कारण तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर संघर्ष करत आहे. मी त्याच्या कुटुंबीयांशी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो आहे. आम्ही त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करू."
रेलिंगवर आदळली कारप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या परिश्रमानंतर कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिल्लीहून रुरकीला येताना अपघातशुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने कारमधून येत होता त्यावेळी हा अपघात घडला. रिषभ पंतचे घर रुरकीमध्येच आहे. त्याची कार नरसन शहराजवळ असताना गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रेलिंग, खांब तोडून कार उलटली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"