नवी दिल्ली : पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. नवनिर्वाचित कर्णधार शान मसूदच्या नेतृत्वात पाकिस्तान बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. शेजाऱ्यांचा संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पोहोचला आहे. कांगारूंच्या धरतीवर उतरताच पाकिस्तानी खेळाडू कुली बनल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद रिझवानसह इतर खेळाडूंनी स्वत:चे सामान स्वत:च उतरवले.
दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंनी सामानाची वाहतूक केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली. काही नेटकरी पाकिस्तानी खेळाडूंना यावरून ट्रोल करत आहेत. पाक खेळाडू विमानतळावर पोहोचल्यावर त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानी दूतावास किंवा ऑस्ट्रेलियातील कोणीही अधिकारी आले नव्हते.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ -शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुला शफिक, अबरार अहमद, बाबर आझम, फरिम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्राम शेहजाद, मीर हमझा, मोहम्मद रिझवान, नौमान अली, मोहम्मद वसिम ज्युनियर, सैय्य अयुब, सलमान अली आघा, सरफराज अहमद, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.
पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना - १४ ते १८ डिसेंबर (पर्थ स्टेडियम)दुसरा सामना - २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)तिसरा सामना - ३ ते ७ जानेवारी (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)