५३ जणांचा चमू घेऊन किवी देशात दाखल झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंपैकी ७ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यात १४ दिवसांच्या आयसोलेशनमध्येही पाकिस्तानी खेळाडू नियम मोडत असल्याचे CCTV फुटेजमधून समोर आले आणि त्यामुळे न्यूझीलंड सरकारनं त्यांना फायनल वॉर्निंग दिली आहे. आता एकही चूक त्यांना थेट न्यूझीलंडमधून हद्दपार करू शकते. अशात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) हा संकटात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बाबर आझम हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दर्जेदार फलंदाज आहे आणि त्यामुळेच त्याची तुलना सतत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी होते. पण, मैदानाबाहेरील बाबर आझमचे 'लफडं' समोर आलं आहे. त्याच्यावर एका महिलेनं लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. लाहोरमधील या महिलेचे नाव हमिझा मुख्तार असे आहे आणि शनिवारी तिनं पत्रकारपरिषद घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजावर गंभीर आरोप केले. क्रिकेटमध्ये नाव कमवण्यापूर्वी बाबरने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले होते आणि मानसिक त्रासही दिला होता, असा आरोप हमिझानं केला. बाबर हा आपला शाळेतील मित्र असून एकाच परिसरात राहत असल्याचा दावाही तिनं केला.
पाहा व्हिडीओ...
बाबर आझमनं २९ कसोटीत २०४५, ७७ वन डेत ३५८० आणि ४४ ट्वेंटी-२०त १६८१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १७ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत.